ताज्या घडामोडी

जत मध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.

*जत मध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.*

तालुका फोटोग्राफर संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास तालुक्यातील फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमास ज्येष्ठ फोटोग्राफर सुर्यकांत जाधव अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कॅमेराचे पूजन करून व नारळ वाढवून करण्यात आले. तालुका अध्यक्ष नुर ईनामदार यांनी सर्व फोटोग्राफरांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच पुढील वाटचालीस सर्व फोटोग्राफर बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शशिकांत शिनगारे ,मधुकर कांबळे, संभाजी टेंगले, नवनाथ देशमाने, रघुनाथ माने, कादर शेख, सुरेश शिंदे, रमेश पवार, बाबासाहेब साबळे ,शशिकांत इंगवले, अजित घोंगडे, अविनाश गावडे व सचिन बनसोडे उपस्थित होते.
*पोलीस टाईम्स न्युज*
जत प्रतिनिधी— *बाबासाहेब साबळे.* सांगली जिल्हा हेड— *विजय तिकोटी.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close