ताज्या घडामोडी

केंद्रीय मंत्री डॉ. भरती ताई पवार यांचे पिंपळगाव बसवंत येथे जल्लोषात स्वागत तुमच्या आशीर्वादामुळेच खासदार व आता मंत्री होऊ शकले.

  1. पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी तेजस खैरनारp

केंद्रीय मंत्री डॉ. भरती ताई पवार यांचे पिंपळगाव बसवंत येथे जल्लोषात स्वागत तुमच्या आशीर्वादामुळेच खासदार व आता मंत्री होऊ शकले.popp

तुमच्या ऋनि सदैव राहणार असून, ऊस उत्पादकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा निफाड ड्रायपोर्टचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी (ता. १७) पिंपळगाव व येथे दिली.

मंत्री डॉ. भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा बसवतमध्ये पोहचली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

भाजपचे नेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील प्रमुख पाहुणे होते.
मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की मंत्रिपद मतदारसंघाच्या विकासासाठी पणाला लावणार आहे. निफाडचे ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा स्वप्नवत राजकीय प्रवास घडला. भविष्यात आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.

सतीश मोरे म्हणाले, की मंत्रिपदावर पोचल्यानंतर डॉ. पवार यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भविष्यातील विकासाची झलक दाखवून दिली आहे. बापूसाहेब पाटिल यांनी नाशिक जिल्ह्याच्या मानाचा तुरा रोवला गेल्याचे नमूद केले.

मतदारसंघाला पहिल्यादाच मंत्रिपदाचा मान मिळाल्याने नागरिक व भाजपच्या कार्यकत्यांचा उत्साह अधिक होता.
हॉटल ऋचा जवळून सजविलेल्या चित्ररथात डॉ. पवार उभ्या राहून नागरिकांना अभिवादन करीत होत्या भव्य होल्डिंग शहरात उभारले होते.

निफाड फाट्यावर डॉ. पवार यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला उपस्थित गर्दीचा उत्साह, जल्लोषात स्वागत पाहून डॉ पवार भारावून गेल्या.

भागवत बोरस्ते, वैकुल पाटील, गोविंद कुशारे,चिंधू काळे, अल्पेश पारख,प्रशांत घोड़के, प्रकाश घोडके, एल. के मोरे, चेतन मोरे, संदीप झूटे, कुसुम निलकंठ आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close