ताज्या घडामोडी

घरपट्टी माफ करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

 

घरपट्टी माफ करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

 

येवला :-प्रतिनिधी. सय्यद कौसर
नगरपालिका प्रशासनाने कोरोना काळातील घरपट्टी माफ करून शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहराध्यक्ष मुशरीफअली शाह यांनी केली आहे. येवला दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून या संदर्भात निवेदनही शाह यांनी दिले आहे.
येवले नगरपालिकेने पाठविलेल्या मालमत्ता कराच्या (घरपट्टी) बिलात  व्याजही लावलेले आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 22 मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरवासीयांनी आपापली दुकाने आणि व्यवहार बंद करीत घरीच थांबून शासनाला सहकार्य केले. या कालावधीत अनेक नागरिकांचे रोजगार बुडाले, उत्पन्नाची साधने बंद झाली तर अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. मात्र जून महिन्यापासून शासनाने अनलॉकला सुरुवात केल्यानंतर सम-विषमच्या चक्रात सर्व व्यावसायिक अडकल्याने ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली. कोरोनाने मार्च महिन्यापासून मोठी लग्न सोहळे, सण उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे तर सप्टेंबर अखेर पर्यंत शाळाही सुरू न करण्याच्या निर्णयामुळे या क्षेत्रांवर अवलंबून असलेल्या अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांवर सध्या बेकारीची कुर्‍हाड कोसळली असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
डिसेंबर अखेरही परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही. त्यातच घरपट्टीच्या व्याजासह बिलांमुळे नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच पुढील काळात नवरात्रोत्सव, दिवाळी हे सणही साध्या पद्धतीने साजरे होतील. त्यामुळे साहजिकच व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाग्रस्त कुटुंबियांना उपचारांच्या खर्चामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. अशा भीषण परिस्थितीत पालिका प्रशासनाने दिलेल्या घरपट्टी माफ करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, नाही तर किमान विलंबाकरिता व्याज वा दंड आकारणी करू नये  अशी मागणी सदर निवेदनात शाह यांनी केली आहे.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close