ताज्या घडामोडी

सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देशाच्या ७४ व्या स्वतंत्र दिवसाचे ध्वजारोहण राजेश वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.*

  • *सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देशाच्या ७४ व्या स्वतंत्र दिवसाचे ध्वजारोहण राजेश वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे प्रत्येक शाळा, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, महावितरण विभाग, इत्यादी ठिकाणी आज १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला आहे. देशाला फिरंगी (अंग्रेज) जुलमी सरकार विरुद्ध पेटून उठलेले भारतातील प्रत्येक जाती धर्माचे लोकांनी सामूहिक रित्या एकत्रित होऊन आपल्या प्राणाची आहुती देऊन सन १९४७ मध्ये देशाला स्वतंत्रता मिळवून दिली. सबब आजचा दिवस हा स्वतंत्रतादिवस म्हणून संपूर्ण भारतातील सर्व देश प्रेमी नागरिककडून हा स्वतंत्र दिवस एका उत्सव व सन प्रमाणे साजरा केला जात आहे.

म्हणूनच या १५ ऑगस्ट रोजी सावदा येथील हाजी इक्बाल हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशन द्वारा संचालित डायमन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी ९ : वाजता स्वतंत्र दिवसाचे ध्वजारोहण राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डायमंड शाळेचे सचिव हाजी हारून सेठ राष्ट्रवादीचे नपा विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, नगराध्यक्षा अनिता पंकज येवले, नगरसेविका नंदाताई लोखंडे, कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले, पीएस आय राजेंद्र पवार, हाजी अजमल सेठ, नगरसेवक सिद्धार्थ बडगे, डॉ. अजित कुमार पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कुशल जावळे, पत्रकार फरीद शेख, युसुफ शाह, शाम पाटील, प्रविण पाटील, साजिद शेख, पिंटू कुलकर्णी, नगरसेविका सगीरा बी सैय्यद तुकडू, मीनाक्षी कोल्हे, विजया कुशल जावळे, शबाना तडवी, पोलीस कर्मचारी संजू पाटील, रिजवान पिंजारी, नईम भाई मोबाईल वाले, शेख निसार शेख नबी, रहीम चायवाले, शेख मुख्तार, फिरोज खान, रउफ मेकॅनिकल, कादिर हाजी, फिरोज टेलर, डायमंड शाळेचे विद्यार्थी सह सर्व टीचर स्टॉप व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

 

यानंतर डायमंड शाळेत स्वतंत्र दिवसाचे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात येथील विद्यार्थी मुलामुलींनी इंग्लिश, उर्दू, हिंदी, मराठी भाषेत स्पीच व देशभक्‍तीवर आधारित गीत म्हटले या कार्यक्रमात उपस्थित सदरील मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मेडल ही देण्यात आले. याप्रसंगी एपीआय देविदास इंगोले, हाजी हारून सेठ, सिमरन राजेश वानखेडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश गजानन वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन डायमंड शाळेचे प्रिन्सिपल असिर काझी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हाजी हरून सेठ मित्रपरिवार सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.

*सावदा येथे शहीद अब्दुल हमीद इस्मार्कवर मान्यवरांनी पुष्पचक्र केले अर्पण.*

तसेच आज १५ ऑगस्ट रोजी गावातील शेखपुरा भागात परमवीर चक्र प्राप्त शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकवर राजेश वानखेडे नगरसेवक फिरोज खान पठाण, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ बडगे,एपीआय देविदास इंगोले, पीएस आय राजेंद्र पवार, नगराध्यक्षा अनिता येवले नगरसेविका नंदाताई लोखंडे मीनाक्षी कोली, पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक सचिन चोडके, शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार शेख अरमान सचिव फिरोज खान कादर खान यांनी पुष्पचक्र अर्पण केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close