ताज्या घडामोडी

नारंगी धरणात 87.07 टक्के पाणी, 95टक्केच्यावर गेल्यावर धरणातून पाणी सोडणार…!

*नारंगी धरणात 87.07 टक्के पाणी, 95टक्केच्यावर गेल्यावर धरणातून पाणी सोडणार…!**कायम दुष्काळ आणि पाणी टंचाईचे चटके सहन करणाऱ्या वैजापूर तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झालाय.त्यामुळे छोटी-मोठी धरणं भरली असून,मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे 2006 मध्ये व 2009-10 मध्ये शहरालगतचे नारंगी धरण भरले होते. त्यानंतर आता 2020 म्हणजेच 14 वर्षानंतर हे धरण भरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे यावर्षी पहिल्यांदाच धरणं भरली आहेत.नारंगी धरणाचा आजचा पाणीसाठा 87.07 टक्के असून, वैजापूर शहर व आसपासच्या गावांचा यावर्षीचा आणि पुढच्या वर्षीचा पाणीप्रश्न मिटणार आहे. धरणातील पाणीसाठा 95% च्या वर गेल्यानंतर नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
: नारंगी सारंगी मध्यम प्रकल्पाचे गेट उघडताना लोकनेते आर. एम वाणी साहेब माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती विशाल संचेती, मुख्याधिकारी बि. यु. बिघोत, प्रकल्प अधिकारी प्रशांत वनगुजरे काझी मलीक पारस घाटे, आदी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close