ताज्या घडामोडी

समीरसिंह साळवे लिखित अव्यक्तांच्या कविता या काव्यसंग्रहाचे नुकतेच ऑनलाईन प्रकाशन झाले व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावरील भावभावनाचे उत्कट वर्णन करत गत पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या कवितांचा या संग्रहात समावेश करण्यात आला आहे.

समीरसिंह साळवे लिखित अव्यक्तांच्या कविता या काव्यसंग्रहाचे नुकतेच ऑनलाईन प्रकाशन झाले व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावरील भावभावनाचे उत्कट वर्णन करत गत पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या कवितांचा या संग्रहात समावेश करण्यात आला आहे.

समीरसिंह साळवे हे सन २०१५ पासून महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उप अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कर्तव्य जोपासताना आपल्यात दडलेला कवीही जिवत ठेवला आहे. लहानपणापासून असलेली कवितांची आवड जपून ती शब्दात मांडत तिचे ‘अव्यक्तांच्या कविता काव्यसंग्रहात रूपांतर केले. सध्या कोविड महामारीचा काळ असल्याने त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन केले.

हा काव्यसंग्रह अव्यक्त मनांच्या भावना व्यक्त करणारा आहे. शहर सोडून जाताना या व्यथा सांगा जगायचे कसे वणवा, महापुरुषांचे मरण, अशा विविध कवितांमधील व्यक्तिचित्रण वाचकांचे लक्ष वेधून घेते.

प्रेम, द्वेष, उत्साह, जिव्हाळा, विश्वास अशा भावना कवितांमधून अधोरेखित केल्या आहेत.

मनाला स्पर्शन जाताना विचार करायला लावणाऱ्या कविता वाचकांना आपल्याशा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

खाकी वर्दीतील दर्दी

पोलीस दलातील त्याचे उल्लेखनिय कामगिरी करिता त्यांना २०२० मध्ये पोलीस शौर्य पदक तसेच पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळतांना त्यांनी कविता लेखनाची आवड जपली आहे. हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. आपली जबाबदारी पार पाडताना आलेल्या अनुभवातून प्रेरित होत यांनी कवितांचे लेखन केले आहे. काव्यसंग्रह प्रकाशनामुळे श्री. साळवे हे खाकी वर्दीतील दर्दी ठरले आहेत. अव्यक्तांच्या कविता हा काव्यसंग्रह अॅमेझॉन तसेच फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

इतबाबू नकोस आणिक झटावे लागेल. वेळ लागी किती तरी बांध फोडावा लागेल

जीव होईल व्याकुळ त्याची काळजी कशाला, लाव नारी शक्ती तुझी

दुःख कोणास नसुते? सारे त्याचे वाटसरू सुखापायी हिंडणारे तू ना एकले पाखल

नशिबाच्या बागेतील फुले असी बेइमान, त्यांची माळ गुंफुनिया बाघ यशाची तोरणे

अजुनिया नाही कोणा क्षितिजाचा आला, जरी सान्यांनी शोधला देव कोणा ना दिसला… – समीरसिंह साळवे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close