ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील जनतेला कोरोंना लासिकरणा विषयी आदिवासी बचाव अभियान नाशिक मार्फत जनजागृती

पोलीस टाईम न्युज
सोमनाथ मानकर सप्तक्षुगी गड

ग्रामीण भागातील जनतेला कोरोंना लासिकरणा विषयी आदिवासी बचाव अभियान नाशिक मार्फत जनजागृती

यावर्षीही कळवण तालुक्यातील पश्चिम पटयातील आदिवासी बहुल भागात जनतेला लसीकरणा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झालेली पाहायला मिळत नसल्याने कोरोना लसीकरण केल्यास मृत्यू होतो अथवा वर्षभरानंतर या लसीकरणाचा त्रास जाणवतो असा गैरसमज येथील नागरिकांमध्ये असल्याने, येथील आदिवासी जनतेमध्ये लसीकरण संदर्भातही जनजागृतीचे काम आदिवासी बचाव अभियान व आदिवासी रावण साम्राज्य ग्रुप करीत आहेत.
९ आँगस्ट विश्व आदिवासी क्रांती दिना निमित्त कळवण तालुक्यातील पश्चिम पटयातील आदिवासी पाड्यांवर आदिवासी बचाव अभियान व आदिवासी रावण साम्राज्य ग्रुप कोविड-१९ संदर्भीय लसीकरण संदर्भात त्यांना समजेल अशा भाषेत कोरोना आजार या विषयी कशी काळजी घ्यावी. तसेच आपण घाबरून न जाता आपली शारीरिक स्वच्छता, मास्कचा वापर करावा. तसेच आदिवासी भागातील व्यक्ती कोविडच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर शिकार होणार नाही या दृष्टीने १८ वर्षा वरील बंधू व भगिनींनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. स्वतः सुरक्षित होऊन कुटुंबालाही सुरक्षित करा असे आवाहन यावेळी आदिवासी बचाव अभियान नाशिक जिल्हा अध्यक्ष राम (रावण) चौरे यांनी केले होते. त्याचा परिणाम १४ ऑगस्ट २०२१ रोजी आदिवासी भागातील कनाशी, मोकभणगी व जयदर येथे कोविड-१९ लसी करणासाठी मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close