ताज्या घडामोडी

*जि प प्राथमिक शाळा चिंचखेड येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा*


मनोहर देसले [ पोलीस टाईम्स निफाड तालूका] जि प प्राथ शाळा चिंचखेड भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष *श्री योगेश विठ्ठल पाटील* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. संजय चौधरी सर यांनी केले.शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धेत नाविण्य मिळविल्याबद्दल सरपंच सौ मिनाक्षीताई गुंबाडे उपसरपंच श्री दादासाहेब पाटील यांच्या हस्ते कार्तिकी चंद्रभान संधान व अंजली बापू जाधव यांना सन्मानित करण्यात आले.ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड योध्दा म्हणून श्री विठ्ठल काळू डंबाळे व दत्ता मोहन राठोड यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.दरम्यान गावातील शिक्षणप्रेमी नागरिक श्री शिवानंद संधान, योगेश पाटील नाना जाधव दैनिक सकाळचे पत्रकार तुषार झेंनफळे कपिल पाटील यांनी राजमाता जिजाऊ,बिरसा मुंडा,महात्मा गांधी अहिल्याबाई होळकर या राष्टीय थोर पुरुषांचे फोटो शाळेला भेट दिले.या प्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली त्यात वेदांत संधान [माझा प्रिय भारत देश ]साई संदिप जगताप[मी तिरंगा बोलतोय ]कार्तिकी चंद्रभान संधान [माझ्या स्वप्नातील भारत ]या विषयांवर भाषणे झाली. महात्मा गांधी व भारत माता भारतीय सैनिक यांच्या वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी गावातील नागरीकही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोंडावार सर यांनी केले.कार्यक्रमासाठी श्री.शंकर ठाकरे, श्री.मनोहर देसले, श्रु.सुधाकर भामरे, श्री.विठ्ठल डंबाळे, श्री.दत्ता राठोड श्री.प्रकाश पाटील श्रीमती.गुरव मॅडम यांनी नियोजन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close