ताज्या घडामोडी

75व्या स्वातंत्र्यदिना निमित्त रक्तदान शिबीर नेवरगाव

नेवरगाव प्रतिनिधी/अनिल पवार

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष (अमृतमहोत्सव) पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नेऊरगाव येथे नेहरू युवा केंद्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली एच.एच.श्री.श्री.मुरलीधर स्वामीजी उद्यानविद्या महाविद्यालय (मालेगाव), ग्रामपंचायत नेऊरगाव, सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था, पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिराचे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात भारतीय स्वातंत्र्याच्या प्रत्येक वर्षासाठी एक अशा 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि योगायोगाने 75 व्या रक्त पिशवीचा क्रमांक 786 आल्यानेही योगायोग सिद्ध झाला.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन एच.एच श्री.श्री.मुरलीधर स्वामीजी उद्यानविद्या महाविद्यालय, मालेगावचे प्राचार्या डॉ.व्ही.डी.पगार, प्राध्यापक व्ही.डी.वाडेकर व नेहरू युवा केंद्र नाशिक जिल्हा युवा अधिकारी कमल त्रीपाठी, कोषाध्यक्ष सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आणि यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील शिवाजी लहारे, मंगेश राठोड, सचिन माने तसेच इतर सहकाऱ्यांनी सेवा बजावली. ग्रामीण भागात इतका उदंड प्रतिसाद लाभलेले हे पहिलेच रक्तदान शिबिर असल्याचे मत डॉक्टर शिवाजी लहारे यांनी व्यक्त केले. प्रसंगी सदर रक्तदान शिबिरास येवला तालुका पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, सावली समाजसेवी बहुद्देशीय संस्था पाटोदाचे अध्यक्ष परसराम शेटे, उपाध्यक्ष मच्छिंद्र काळे, खजिनदार पंकज मढवई, ग्रामसेविका वैशाली पुरी, निवृत्त सैनिक गोपीचंद गांगुर्डे, सैन्यदलात सेवा बजावत असलेले बाळु कदम, महिला भगिनी सुनिता कदम, रंजना पेंढारे, ग्रामस्थांनी भेट दिली. सदर रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी कृषीदुत सौरभ कदम,संग्राम ढोमसे,रुपेश जाधव,नेहरू युवा केंद्र युवा राष्ट्रीय स्वयंसेवक येवला तालुका रवींद्र बिडवे व रूपाली निकम यांनी काम पाहिले. प्रसंगी सरपंच मोनाली सोनवणे,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तीपत्र व कडुनिंबाचे झाड भेट देण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close