ताज्या घडामोडी

*रावेर तहसीलदार उषाराणी देवगुंणे यांच्यावर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा*

*रावेर तहसीलदार उषाराणी देवगुंणे यांच्यावर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा*

Ī
सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तहसीलदार यांची मनमानी कारभार विषयी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दि.११/०८/२०२१ बुधवार रोजी दुपारी १ वाजता महाशय उप विभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर कैलास कडलक व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अधिक माहिती अशी की दि.९ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ४:३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे ७ पदाधिकारी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्या मध्ये अति वृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे शेती पिके वाहून गेल्यामुळे व संपूर्ण घरांची पडझड झाल्या मुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज तागायत मदत मिळाली नसल्याने व सर्व सामान्य माणसांना सुद्धा घर बांधण्याकामी कोणत्यास प्रकारची मदत मिळाली नाही.तसेच रावेर, यावल तालुक्यात जून जुलै मध्ये वादळामुळे कापणीवर आलेल्या केळी पिकाचे शेतकर्याचे संपूर्ण नुकसान झालेले असून आता पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने कोणतीच मदत केलेली नाही अश्या मागण्यांचे शेतकऱ्याच्या हिताचे निवेदन देण्यासाठी गेलेले वंचित बहुजन आघाडीचे ७ पदाधिकारी पासून रावेर तहसिलदार यांनी निवेदन स्वीकारण्यास मनाई केली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी जाब विचारले की, तुम्ही आमच्या पक्षाचे निवेदन का घेत नाही. व असा भेदभाव का करीत आहे. तेव्हा तहसीलदार मॅडम जोरात बोलून म्हणाल्या की मी फक्त ५ लोक असतील तेव्हाच तुमचे निवेदन घेईल अन्यथा निवेदन घेणार नाही. असे म्हणून कॅबीनच्या बाहेर निघून जा.
यावरून आम्ही पुन्हा विचारणा केली कि याआधी कॉंग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी व इतर पक्षाचे निवेदन तुम्ही करोना काळात सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन १५ ते २० संख्या मध्ये येणाऱ्या तुम्ही त्यावेळी पक्षाचे लोकांकडून निवेदन घेतले आहे व आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे निवेदन घेताना ५ लोकांची अट का असे प्रश्न विचारले असता त्यांनी उर्मीट पणे व जोर जोरात बोलून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा अपमान होईल असे बोलून वक्तव्य केले अश्या या बेजबाबदार आणि जातीयवादी वर्तणूक करणाऱ्या तहसिलदार मॅडम हया जोरजोरात बोलू लागले कि हा माझा मनाचा प्रश्न आहे इथली अधिकारी मी आहे कि तुम्ही आहे.तुम्ही मला कायदा शिकवू नका अशा अपमानास्पद भाषेमध्ये गोपनीय पोलीस पुरषोत्तम पाटील यांना म्हणाल्या की मी तुम्हाला आधीच सांगितले होते कि अश्या भांडणखोर लोकांना निवेदन देण्यासाठी का आणले अशा अपमानास्पद भाषेत त्यांच्या बोलण्यावरून असे सिद्ध होत आहे. तहसिलदार मॅडम जातीवादी असून आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान करता अशा बेजबादार व जातीवादी रावेर येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना निलंबीत करण्यात यावे. अन्यथा रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने येत्या १५ ऑगस्ट रोजी तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल होणा-या परिणामास तहसिलदार व शासन जबादार राहील याची शासनाने नोंद घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन प्रांताधिकारी कैलास कडलक पोलीस विभागीय अधिकारी फैजपूर यांना व रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना देण्यात आले. निवेदन देतांना उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटनीस दिनेशभाऊ इखारे, रावेर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा कामगार नेते बालाजी पठाडे,यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे,रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शाह,रावेर तालुका उपाध्यक्ष विनोद तायडे, रावेर तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, रावेर तालुका सचिव अर्जुन वाघ, रावेर शहर उपाध्यक्ष इम्रान शेख, रावेर शहर सचिव दौलत अढांगळे, फैजपूर शहर सचिव सोनु वाघूळदे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close