ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यातून बैलाच्या शर्यती चालू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा.

हेडर,””सांगली जिल्ह्यातून बैलाच्या शर्यती चालू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा.

आज दिनांक 11 /8/ 2021 रोजी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जिल्ह्यातून बैलांच्या शर्यती पुन्हा एकदा चालू करण्यासाठी लोकांनी कार्यालयाच्या समोर बेधडक मोर्चा काढला.याठिकाणी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून मुले ,वयस्कर वृद्ध ,तरुण आज मोर्चाला आलेले होते. सकाळपासून ते कार्यालयाच्या बाहेर दिवसभर थांबले होते . त्यांनी कार्यालयासमोर लवकरात लवकर शर्यती चालू करण्या बद्दल घोषणाबाजी केली . शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.बैलाच्या शर्यती रद्द केल्यामुळे गावागावातून गावकरी ग्रामस्थ संतापले आहेत.जी लोकं शर्यती करून आपले हातावरचे पोट चालवत असतात . त्यांचं काय होणार. पहिल्यासारखा शर्यती चालू कराव्यात, हे नागरिकांच्या आणि बैल प्रेमिंच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे . तरी लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे . असे शेतकरी बोलत होते. बैलांच्या शर्यती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. गोरगरिबांच्या पोटावरती पूर्णपणे पाय दिला जातोय . असं मत बैल प्रेमातून व्यक्त होत आहे. आज दुपारी अडीच वाजता सर्व गावकऱ्यांनी बोराडे मॅडम च्या केबिन मध्ये जाऊन बोलणी केली. त्यावेळी बोराडे मॅडम म्हणाल्या की आम्ही मुख्यमंत्र्यांना पुढे निवेदन पाठवून पत्र लिहून पत्र व्यवहार करू, तुमचा प्रश्न सोडवला जाईल.जरी बैल शर्यती बंद झाल्या असल्या तरी आम्ही ज्या आत्ता गाई आहेत, त्यांना पूर्णपणे अनुदान देण्याची प्रयत्न करू.त्या पुढे म्हणाल्या की आम्ही लवकरात लवकर या विषयावर चर्चा करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि ग्रामस्थांनी तिथून तहसीलदार ऑफिस ला जाऊन सगळ्यांच्या सहाय्याने तहसीलदार ऑफिसला एक निवेदन देण्यात आले .सलगर येथील राजेंद्र निंबाळकर पुढे म्हणाले की आमचा पोशिंदा जर आमच्यापासून हिरावला जात असेल ,तर आम्ही जगायचं कसं? आम्ही खायचं काय ?पन्नास टक्के लोक आपल्या गावातील गाईंच्या आधारावरती आहेत .आणि पुढे जाऊन बैल शर्यती जर बंद होणार असतील ,तर आम्ही जगायचं कसं ?हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित आहे. पोलीस टाईम न्युज ,
सारिका जमदाडे,
सांगली जिल्हा प्रमुख ,
विजय तीकोटी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close