ताज्या घडामोडी

15 ऑगस्ट पासून 10 वाजेपर्यंत मुभा

15 ऑगस्ट पासून 10 वाजेपर्यंत मुभा

राज्यात मिशन बिगेन अगेन प्रमाणे कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यामुळे पुन्हा निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र यावेळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्या ४ वाजेपर्यंत सुरु होतं मात्र आता १५ ऑगस्टपासून १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मॉल्स सुरु करण्यात आले असून केवळ दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यमंत्रि मंडळ बैठकत १५ ऑगस्ट पासून राज्यातील सर्व हॉटेल आणि उरगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळा ४ पर्यंत ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये बदल करुन रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आता निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. राज्य सरकारविरोधात हॉटेल व्यावसायिकांनी केलेल्या आंदोलनांना आणि मागणीला यश आलं आहे. राज्यात हळूहळू सर्व सुरळित करण्यात येणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होते. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वेळा वाढवून द्याव्यात अशी विनंती केली होती.

मॉल्स सुरु पण.

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मॉल्स सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मॉलमध्ये ५० टक्के लोकांना जाता येणार आहे. मॉलमधील सर्व दुकान, शॉपमध्ये कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार असून केवळ २ लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील ५० टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. मात्र राज्य सरकारने सिनेमा, नाट्यगृह सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने लग्न सोहळ्यासाठी ५० टक्के लोकांची उपस्थिती ठेवण्यास परवानगी दिली आहे. धार्मिक स्थळांबाबत सध्या निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वेला तीन महिन्यांच्या पासच्या सूचना

ज्या नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत आणि दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशा नागरिकांना पास देण्यात येणार आहे. रेल्वेकडून पास देण्यात येईल तसेच लसधारकाच्या प्रमाणपत्रानुसार पास देण्यात येईल. राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनास १ आणि तीन महिन्यांच्या पासच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पासची वैधता पडताळणीबाबत रेल्वेला अधिकार देण्यात आले आहेत. पास ज्या दिवसापर्यंत असेल त्याच दिवसापर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्रिमंळाचा मोठा निर्णय

हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार
रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के उपस्थिती, मॉल्समध्ये दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीचे दोन डोस झालेले असणं बंधनकारक
दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी
लोकलसाठी मासिक आणि तीन महिन्यांचे पास देण्याच्या सूचना
खुल्या प्रांगणातील विवाह सोळ्यांना २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी
बंद मंगल कार्यालयातील विवाह सोळ्यांना बैठक क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी
सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंद
इनडोअर खेळ सुरु ठेवण्यास परवानगी
खासगी कार्यालयांना २४ तास सुरु ठेवण्याची मुभा
कार्यालयात २५ टक्के क्षमतेनं शिफ्ट्स मध्ये काम कामाच्या सूचना

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close