ताज्या घडामोडी

संबंधित यंत्रणाकडून कारवाईला जाणीवपूर्वक विलंब : अवैध बायोडिझेल पंप मालक मोठी कमाई करुन अटक ऐवजी मोकाट* सावदा येथील अवैध बायोडिझेल विक्रीचा बहुचर्चित प्रकरण.

*संबंधित यंत्रणाकडून कारवाईला जाणीवपूर्वक विलंब : अवैध बायोडिझेल पंप मालक मोठी कमाई करुन अटक ऐवजी मोकाट*

सावदा येथील अवैध बायोडिझेल विक्रीचा बहुचर्चित प्रकरण.

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गेल्या अनेक दिवसांपासून तालुका व स्थानिक सरकारी यंत्रणेच्या नाकाखाली कोणतीच परवानगी न घेता स्वतःच्या समरी पावरमध्ये थेट एक नव्हे दोन पंप टाकून अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू होता.

गेल्या २० दिवसापुर्वी राकेल मिश्रित बायोडिझेल विक्री करणाऱ्या दोन जणांना मुद्देमालासह छापा टाकून रावेर पोलीसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी गुन्हा दाखल करणे कामी पोलीस व महसूल विभागात जुंपली होती.परिणामी अवैध बायोडिझेल विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सावदा येथील एक नव्हे दोन बायोडिझेल पंप बिनदिक्कतपणे चालवले जात होते. यात पंप मालकांनी मोठी आर्थिक कमाई सुद्धा केलेली आहे. तसेच या प्रकरणी सदरील पंप मालकाकडून संबंधित अधिकाऱ्यांची चांदीच चांदी झाल्याची चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये सुरू आहे.

याबाबत वेळोवेळी पोलीस टाईम न्युज यांनी बातम्या प्रकाशित केल्याने प्रथम फैजपूर रोडवर डायमंड ट्रान्सपोर्टच्या मागे भाड्याने घेतलेली जागेवर सुरू असलेले झुलेलाल बायोडिझेल पंपला फक्त नाम मात्र पंचनामा करून सावदा मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, पुरवठा निरीक्षक रावेर यांनी सील केले होते. मात्र रावेर रोडवरील दुसरे अवैध बायोडिझेल पंप मालकावर सरकारी यंत्रणेला गुन्हा दाखल करण्याची गोष्ट म्हणजे एव्हरेस्ट शिखर गाठण्या सारखे वाटत असले तरी त्या पंपाला नाम मात्र पंचनामा करून साधी सील सुद्धा आजपावेतो लावण्यात आलेली नाही. यंत्रणेची यामागील लाचारी की चिरीमिरी यापैकी नेमके कारण काय ही बाब जितकी समजण्या पलीकडची दिसून येते त्यापेक्षा अधिक खेदजनक आहेत. हे मात्र खरे

परिणामी वेळीच संबंधित यंत्रणेकडून ठोस व कठोर कारवाई सदरील अवैध कारभार चालवणारी मंडळीवर केली जात नाही. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच कुठेतरी पसार होऊन जातात. आणि अटक होण्या ऐवजी आधीच अवैध कारभारातून केलेली मोठी आर्थिक कमाईतून स्वतःला वाचवण्यासाठी कायद्याचा आधार घेत थेट अटकपूर्व जामीन मिळवून मोकाट मजेत फिरतात. सदरील अवैध प्रकरणातील हिच वस्तुस्थिती आहे. आणि यंत्रणेने घेतलेली धूर्तराष्ट्रची भूमिकांमुळेच याचा दुतर्फी फायदा अवैध कारभारी यांना मिळतो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close