ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा….

जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा चिंचखेड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा….
मनोहर देसले [तालूका प्रतिनिधी] यांचे कडून…
जि. प. प्राथ. शाळा चिंचखेड येथे जागतिक आदिवासी दिनाचे निमित्ताने जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला प.स.सदस्या सौ.संगिता ताई घिसाडे यांनी पुष्पहार घालून प्रतिमेचे पुजन केले या प्रसंगी चिंचखेड गावच्या सरपंच सौ. मिनाक्षीताई गुंबाडे,माजी सरपंच श्री. संजय पंढारे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.योगेशभाऊ विठ्ठल पाटील सामाजिक कार्यकर्ते शिवानंदभाऊ संधान,सोमनाथ पाटील कपिल पाटील आदिवासी विकास मंच चे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,या प्रसंगी श्री.सुधाकर भामरे सर श्री.उत्कर्ष कोंडावार सर यांनी आदिवासी गौरव दिनाचे महत्व सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.डंबाळे सर,राठोड सर व प्रतिभा गुरव म्याडम यांनी विशेष प्रयत्न केले.
आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास मंचच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 5 लिटर सॅनिटायर देण्याचे जाहीर केले.स्वागत व आभार कोंडावार यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close