ताज्या घडामोडी

जत(साळमळगेवाडी) येथील घरफोडी करण्याऱ्यास अटक. *

बाबासाहेब साबळे/ जत प्रतिनिधी. विजय तिकोटी/ जिल्हा हेड.

*जत(साळमळगेवाडी) येथील घरफोडी करण्याऱ्यास अटक. *

बाबासाहेब साबळे/ जत प्रतिनिधी. विजय तिकोटी/ जिल्हा हेड.

जत येथील साळमळगेवाडी गावी दिनांक 25.5.2021 रोजी हौसाबाई नकुसा मासाळ यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने 1,52000रुपये किमतीचे चोरीस गेले होते. तसेच दिनांक 29. 7 .2021 रोजी अजित शामराव मदने राहणार कंठी तालुका जत यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने रक्कम 57,000 रुपये किमतीचे व रोख रक्कम 15000/- रुपये चोरीस गेले होते. तथापी चोरीचा तपास जत पोलीस ठाणे करीत असताना दिनांक 8 .8.2021 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडून बातमी मिळताच सावंता रावसाहेब दुधाळ वय 38 राहणार साळमळगेवाडी तालुका जत यास ताब्यात घेण्यात आले .सदर आरोपीस माननीय न्यायालय समोर हजर करून पोलीस रिमांड घेण्यात आल्याने त्याने साळमळगेवाडी व कंठी येथील घरफोडी करून चोरी केल्याचे कबूल केले. पुढील तपास पोलिस नाईक मासाळ करीत आहेत. सदर गुन्ह्यांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री. दीक्षित गेडाम ,उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले ,पोलीस निरीक्षक आपासाहेब कोळी जत पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close