ताज्या घडामोडी

पोलीस मित्र समिती नाशिक जिल्हा यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

पोलीस मित्र समिती नाशिक जिल्हा यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

सांगली, कोल्हापूर, रायगड, वर्षापासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा पूरग्रस्त भागातील | लोकांना मदत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पोलीस मित्र समिती ने पुढाकार घेतला आहे.
अतिशय वेळेत तत्परतेने मदत गोळा करून कोल्हापूरच्या दिशेने मदतीचा एक पिकअप घेऊन स्वतः पोलीस मित्र समितीतील पदाधिकारी व सभासद कोल्हापूर महाड च्या दिशेने रवाना झाले आहे.
पोलीस मित्र समिती हि एक पूर्ण नाशिक जिल्हयातील आम्ही समाजाचे काही तरी देणे लागतो. या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या तरुणांचा हा समुह आहे. यांच्यातील दुवा म्हणून या पोलीस मित्र समिती ने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आता सांगली, कोल्हापूर, महाड आणि कोकणातील आदी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच
महाड येथे झालेल्या पूरपरिस्थिती मध्ये अनेक घरे उध्वस्त झाली , अनेक सामाजिक संस्था व संघटना यांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्यातील पोलीस मित्र समिती ने सामाजिक बांधिलकीचा वारसा हाती घेऊन महाड येथे धान्य,जीवनावश्यक वस्तूचे वाटप करयात आले.
या सर्वांच्या मदतीने या पूरग्रस्तांना थोड्या फार प्रमाणात जगण्यासाठी धीर मिळाला.
तसेच पोलीस मित्र समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने रविवारी महाड येथे पूरग्रस्तांना धान्यकिट व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस मित्र समिती नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष ओमकार तासकर , संपर्क प्रमुख किशोर शिंदे, तसेच येवला तालुका संपर्क प्रमुख सागर घुसळे ,निफाड तालुका विद्यार्थी – संघटक -शुभम जगताप तसेच,नांदगाव तालुका अध्यक्ष-ललित मोकळ, देवळा तालुका अध्यक्ष -प्रवीण झाडे, चांदवड तालुका अध्यक्ष -मयूर घुमरे तसेच नयन भोसले, निलेश भालेराव, रामेश्वर गाजरे, आदेश रोटे, संकेत कुंदे, समाधान पवार, जनार्धन शिंदे अंकुश अहिरे, वशिम काद्रीइ. पोलीस मित्र समितीतील सर्व पदाधिकारी व सभासद आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close