ताज्या घडामोडी

सावदा येथील शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांचेघरी ना. यशोमती ठाकुर यांची भेट*

*सावदा येथील शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी यांचेघरी ना. यशोमती ठाकुर यांची भेट*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यातील खिरोदा येथे एका कार्यक्रमात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री ना.सौ यशोमती ठाकूर यांनी सावदा येथील कोरोनामुळे एका महिन्यातच परदेशी कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने सदरील कार्यक्रम आपटून फैजपुर कडे जातांना शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी यांचे घरी सकाळी १० वाजे दरम्यान सांत्वनपर भेट दिली.व येथील परदेशी कुटुंबातील मुलांची भेट घेऊन धीर देत त्यांचे सांत्वन केले.

याप्रसंगी ना. यशोमती ठाकूर यांनी परदेशी कुटुंबातील सदस्यांशी वार्तालाप करून त्यांच्याकडून लागोपाठ झालेल्या दुर्दैवी आघातांची माहिती जाणून घेतली. राज्य सरकारने आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी जाहीर केलेल्या सर्व योजनांचे लाभ हे त्यांना मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली. तर आपण तुमच्यासोबत असल्याचा धीर देखील ना. ठाकूर यांनी याप्रसंगी दिला. तर त्यांनी परदेशी कुटुंबातील पाच मुलांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली. तसेच त्यांनी शहरप्रमुख सूरज परदेशी व परिवारास धीर दिला व आपल्या कुटुंबाने जी समाजसेवेचा वारसा आपणास दिला आहे तो असाच पूढे सुरु ठेवा, आम्ही आपल्या सोबत सैदव आपली मोठी बहिण म्हणून असून भविष्यात काही आवश्यकता भासल्यास नक्की मदत करेल असे यावेळी सांगितले

यावेळी त्यांचे सोबत मुक्ताईनगर मतदार संघाचे आ. चंद्रकांत पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, नाशीक महिला बालकल्याण अधिकारी, शिव सेना शहर संघटक निलेश खाचणे, शाम पाटिल, गणेश माली, मनीष भंगले, नितिन सपकाले, स्वपनिल परदेशी, आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close