ताज्या घडामोडी

येवला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी,दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा

  • येवला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी,दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा.
  • अंदरसुल प्रतिनिधी
    हितेश दाभाडे
  • नवी दिल्ली, येथे येवल्याचे भाजपचे पदाधिकारी यांनी विविध कामा संदर्भात केंद्रीय मंत्री भारती पवार यांची मंत्रालयात भेट घेतली.त्यावेळी ताईंनी येवल्याच्या कोरोना रुग्नांचा आढावा घेतला,व इतर परिस्थिती बद्दल विचारपूस केली,तेंव्हा ताईंशी बोलतांना संतोष केंद्रे यांनी तालुक्यात सद्यस्थितीत पावसाने पाठ फिरवली असून शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगितले तेंव्हा ताईंनी शेतकऱ्यां विषयी खुप चिंता व्यक्त केली.त्या नंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलेली आहे.यात राज्यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरणाच्या कामाचाही समावेश असून या पैकी येवल्या तालुक्यातील मातूलठान-धामणगाव-अंदरसुल-बोकटे रस्ते दुरुस्तीसाठी १.४७ कोटी मंजूर असून या रस्त्याची खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे,म्हणून या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्या साठी संबंधित विभागास सूचना कराव्या असे भाजपचे ग्रामीण युवा मोर्चाचे ता.अध्यक्ष संतोष केंद्रे यांनी केंद्रीय मंत्री भारती ताईंशी बोलतांना सांगितले.त्या नंतर रावसाहेब दानवे यांना भेटुन रेल्वेमंत्र्यांलया कडून येवला रेल्वेस्टेशन येथे गोवा एक्सप्रेस आणि झेलम एक्सप्रेस या गाड्यासाठी थांबा मिळावा या विषयी चर्चा केली,तेंव्हा प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले.त्यांनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्ष वाढी साठी मार्गदर्शन केले.त्या वेळी येवला भाजपा ग्रामीण युवा मोर्चा ता.अध्यक्ष संतोष केंद्रे,नाशिक ग्रामीण युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण पवार,भाजपा युवा मोर्चाचे अंदरसुल शहराध्यक्ष मच्छिंद्र हाडोळे आदी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close