ताज्या घडामोडी

चिंचोले ता चांदवड येथील टमटाधारक शेतकरी नुकसानीने हैराण

चिंचोले ता चांदवड येथील टमटाधारक शेतकरी नुकसानीने हैराण

नासिक जिल्हा प्रतिनिधी :: शांताराम घुले

चांदवड तालुक्यातील टमाटे उत्पादक शेतकरी श्री चंद्रकांत जाधव यांनी माहिती दिली की पावसाची रिपरिप 9ते 10 दिवस झाल्याने टमाटे पिकाचे नुकसान झाले आहे.टमाट्यावर काळ्या रंगाचे टिपके पडल्याने संपूर्ण माल खराब होऊन उखरड्यात फेकून देण्यात आलेला आहे.सदर शेतीमाल 250 ते 300 रु कॅरेट ने जात असताना अश्या टिपके पडल्याने अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री चंद्रकांत रमण जाधव चिंचोलेकर यांनी सांगितले.
अशे चांदवड तालुक्यातील चिंचोले येथील बहुतांशी टमाट्याचे प्लॉट खराब झाल्याचे समजते.पहिलेच कोरोनाच्या संकटाला तोंड देत उभा असलेल्या शेतकरुल्याचे असे नुकसान झाल्याने शेतकऱ्याने पाहावे तरी कुणाकडे?
एकीकडे पीकविमा काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना काही ठिकाणी पैसे न मिळाल्याने पीक विमे काढले नाहीत व आता असे संकट आल्याने तोंडचा घासच पळाला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close