ताज्या घडामोडी

जमियत_उलेमा_ए_हिंद आणि #मदनी_चॅरिटेबल_ट्रस्ट_सांगली पुन्हा एकदा ठरली हजारो पुरग्रस्तांच्या कुटुंबाचा आधार*

प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर* *सांगली

*#जमियत_उलेमा_ए_हिंद आणि #मदनी_चॅरिटेबल_ट्रस्ट_सांगली पुन्हा एकदा ठरली हजारो पुरग्रस्तांच्या कुटुंबाचा आधार*

सांगली शहरातील काही भागांना महापुराचा जोरदार तडाखा बसल्याने पुरग्रस्तांच्या घरातील उपयुक्त साहीत्यासहीत, अन्नधान्य आणि कपड्यांचीही मोठ्या प्रमाणात वाताहत झाल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. २०१९ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्याही कठीण परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदती साठी *#जमियत_उलेमा_ए_हिंद आणि #मदनी_चॅरिटेबल_ट्रस्ट_सांगली या संस्था फार मोठी भुमिका बजावत असुन आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी पुराचा सर्वात जास्त प्रकोप अनुभवलेल्या परिसरात म्हणजेच #दत्त_नगर #काका_नगर #वाल्मिकी_आवास #झेंडा_चौक #शिवशंभो_चौक या सर्व ठिकाणी संस्थेमार्फत अतिशय सूत्रबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने पूरग्रस्तांना तब्बल #दोन_मोठे_ट्रक भरुन #कपड्यांचे वाटप करण्यात आले. यात पुरग्रस्तांच्या कुटुंबतील लहान मुलांमुलींसाठी, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठींही कपड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पुरग्रस्तांची पुरती वाताहात झाली असताना संस्थेमार्फत कपड्यांचे वाटप झाल्याने असंख्य कुटुंबांसाठी नव्याने संसार उभारणीसाठी हातभार लागल्याचे समाधान या भागातील रहिवासी लोकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे*.

*सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदती साठी जमियत उलेमा ए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मदतकार्य राबवत असून या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास वीस हजार पुरग्रस्त कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्या किटचे पॅकिंग करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असुन लवकरच पुरग्रस्तांना त्याचेही वाटप करण्यात येणार आहे.*

*प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close