ताज्या घडामोडी

खोपोली शिळफाटा येथे शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या कार्यालयाचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न

खोपोली शिळफाटा येथे शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या कार्यालयाचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न

खालापूर-

समाधान दिसले

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेनाप्रमुख – कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने तसेच अवजड वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रजित बल यांच्या सूचनेनुसार राज्य सचिव नरेश चाळके यांच्या सहकार्याने युवासेना सहसचिव, राज्य विस्तारक तथा अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष अरुणजी गायकवाड यांच्या सौजन्याने शिळफाटा खोपोली येथे शिवसेना अवजड वाहतूक सेनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात नुकताच संपन्न झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता.

शिवसेना – युवासेना, अवजड वाहतूक सेना सोबतच सर्व अंगीकृत संघटना एकत्र येऊन पक्षाची बांधणी तसेच जनसेवेचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून सुरूच राहणार असल्याचे मत प्रमुख मान्यवरांनी करीत याप्रसंगी अरुण गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना परिवारातील सर्वच पदाधिकारी हजर होते.

तर युवासेनेचे विस्तारक आणि मावळ लोकसभा संपर्क प्रमुख राजेशजी पळसकर, राज्य सहसचिव – विस्तारक – जिल्हाध्यक्ष रुपेशदादा पाटील, अवजड वाहतूक सेनेचे सचिव नरेश चाळके, युवासेना पुणे जिल्हा समनव्यक अनिकेतजी घुळे, अवजड वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष बाबूजी मोरे, उपाध्यक्ष बॉबीजी भाटिया,’उपसचिव विजयानंद माने, खोपोली नगरपरिषद गटनेते शहरप्रमुख सुनीलजी पाटील, शहर युवा अधिकारी संतोष मालकर, उद्योजक हरिषजी काळे, तसेच अवजड वाहतूक सेनेचे कर्जत-खालापूर तालुक्यातील पदाधिकारी, खोपोलीतील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, आजी माजी पदाधिकारी – कार्यकर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close