ताज्या घडामोडी

कळंब येथे पोशिर नदीत तरुण बुडाला पोलीस प्रशासन ,रेस्क्यू टीमकडून शोध सुरू…..

कळंब येथे पोशिर नदीत तरुण बुडाला
पोलीस प्रशासन ,रेस्क्यू टीमकडून शोध सुरू…..

नेरळ : दिपक बोराडे

कर्जत तालुक्यातील कळंब गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या पोशिर नदी पात्रात गुरुवारी 5 ऑगस्टला एक 27 वर्षीय तरुण बुडाला असून,पोलीस प्रशासन ,रेस्क्यू टीमच शोधकार्य सुरू केले आहे ,मात्र सायंकाळ सहा वाजेपर्यंत तरुण सापडून आला नाही ,
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कळंब कातकर वाडी येथे राहणारा 27 वर्षीय तरुण शशी भीमा वाघमारे हा आपला मित्र महेंद्र बदे यांच्या सोबत चारचाकी गाडी धुण्यासाठी कळंब गावा जवळील पोशिर नदीवर गेला असता नदीपात्रातील ‘चौदावा डोह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोहात पाय घसरून पडला, या डोहात पाणी खोलवर असल्याने पाण्याचा प्रवाहात वाहून दिसेनासा झाला ,सोबत असलेला महेंद्र बदे घाबरला व मदतीसाठी आरडाओरडा केल्याने स्थानिक लोक जमा झाली ताबडतोब घटनेची माहिती पोलिसांना दिली .घटनेची माहिती समजतात नेरळ पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस अधीकारी संजय बांगर , उप निरिक्षक केतन सांगळे त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार भरत गर्जे ,पो ह .गिरी ,निरंजन दवणे, एकनाथ गर्जे ,चव्हाण मॅडम ,भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ,स्थानिकांच्या सहकार्याने नदी पात्रात शोध घेतला मात्र तरुण सापडून आला नसल्याने खोपोली येथील रेस्क्यू टीम ला पाचारण करण्यात आले ,
एका तासाभरात खोपोली येतील रेस्क्यू टीमचे प्रमुख गुरू साठेलकर त्याच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले व तातडीने नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली आहे ,संध्याकाळ पर्यंत शोध मोहीम सुरूच असून अद्यापही तरुण सापडून आला नाही .
काही दिवसांपूर्वीच देवपाडा येथील तरुण 26 वर्षीय जगन जोशी याच पोशिर नदीत वाहून घेल्याची घटना घडली होती ,मात्र त्याचा ही शोध आजपर्यंत लागला नाही , आज पुन्हा शशी वाघमारे हा तरुण बुडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

चौकट:-

‘चौदावा डोह ‘
पोशिर नदी पात्रातील कळंब गावा नजीक असलेल्या ‘चौदावाडोह’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या डोहात आजपर्यंत अनेक जण बुडल्याच्या घटना घडल्या असल्याचे येथील स्थानिक सांगत आहेत ,हा डोह खोल असून तळाशी काही कपार्या असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे या डोहात बुडालेली व्यक्ती जिवंत बाहेर येत नसल्याने या भागातील माहितगार सांगतात, त्यामुळं सहसा डोहाकडे कोणी फिरकत नाहीत .
चौकट:
‘ रेस्क्यू टीमची गरज ‘
गेल्या काही वर्षांपासून नेरळ व परिसरातील नद्या ,तलाव, धरण परिसरात पावसाळी पर्यटक तसेच स्थानिक व्यक्ती ही बुडल्याच्या घटना घडल्या आहेत, वारंवार घडत आहेत ,कर्जत – नेरळ येथे रेस्क्यू टीम नसल्याने एखादी घटना घडल्यास खोपोली येथील टीम बोलवावी लागत आहे ,त्यांना ही घटनास्थळी पोहचायला तास दीड तास लागतो परिणामी काही वेळेस उशीर झाल्याने बुडालेल्या व्यक्तीना वाचविण्यात यश येत नाही ,शोध घेण्यास ही अडचणी निर्माण होतात ,त्यासाठी कर्जत किंवा नेरळ परिसरात एक रेस्क्यू टीम तयार करण्यात यायला हवी असे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close