ताज्या घडामोडी

सावदा येथे आ. चंद्रकांत पाटील यांनी घेतली आढावा बैठक – बैठकीत नागरिकांनी वाचला तक्रारीचा पाठा*

*सावदा येथे आ. चंद्रकांत पाटील यांनी घेतली आढावा बैठक – बैठकीत नागरिकांनी वाचला तक्रारीचा पाठा*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दि. 3 रोजी कोचुर रोडवरील नगर पालिकेच्या सभागृहाचे आवारात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहराचे विविध समस्या जाणून घेण्यासाठी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या प्रामुख्याने यात पालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सोमेश्वर नगर, निमजाय माता नगर, कृषी उतपन्न बाजार समिती मागील भाग येथील नागरिकांनी या भागात रस्ते व्यवस्थित नाही, पिण्याचे पाणी येत नाही, स्वच्छता होत नाही आदी बाबत तक्रारी सांगितल्या यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सदर भाग नव्याने पालिका हद्दित समाविष्ट झाला असून येथे पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी योजना मंजूरी साठी टाकला असून त्याचा टी,पी,आर, मंजूर झाला आहे तो मंजूर झाल्यावर येथे काम होईल तोपर्यंत येथे पाईप लाईन टाकून मग रस्त्याचे काम लवकर सुरु करू म्हणजे याकाम साठी परत रस्ते खंदावे लागणार नाही सोबत गटारीचे काम देखिल सुरु करणार आहोत, तसेच याभागात स्वच्छते साठी घण्टा गाडी ची व्यवस्था त्वरीत करण्यात येईल तसेच ज्याठिकानी सोय आहे तेथे त्वरित स्ट्रीट लाइट देखील बसविण्यात येतील असे सांगितले तर आ. चंद्रकांत पाटील यांनी सदर पाणी पुरवठा योजन बाबत आपण स्वत: त्वरीत पाठपुरावा करून सदर योजना मार्गी लाऊ असे सांगितले व याच वेळी त्यांनी सदर कमा बाबत वरिष्ठ अधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधुन तशा सूचना केल्या.

बुधवार पेठ परिसरातील नागरिकांनी मोकाट डूकारांचा त्रास वाढला असून बंदोबस्त करण्याची मागणी केली, याचवेळी नागरिकांनी ऐन लॉकडाउन मुळे आर्थिक परिस्थिति खराब असताना सक्तिची विज बिल वसूली होत असल्या बाबत तक्रार मांडली तेव्हा सक्तिची बिल वसूली करू नका नागरिकांना त्यांचे हफ्ते पाडून दया अश्या सूचना महावितरणच्या अधिकारी यांना केल्या सर्व तक्रारी लवकरात लवकर त्या त्या वीभगाने सोडवाव्या अश्या प्रकारच्या सूचना केल्या

यावेळी व्यासपीठावर आ. चंद्रकांत पाटील यांचे सोबत नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, फिरोजखान पठाण, शे, अल्लाबक्ष, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, माजी नगरसेवक शाम पाटील, धनंजय चौधरी, शहरप्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, सचिव शरद भारंबे, मिलिंद पाटील, नीलेश खाचणे, अभिजीत मिटकर, मनीष भंगाळे, गौरव भैरव आदी उपस्थित होते,

तर प्रशासना कडून नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, बांधकाम अभियंता धनराज राणे, अविनाश गवळे, पाणी पुरवठा अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील, आरोग्य अधिकारी महेश चौधरी, पोलीस प्रशासन से.पो.नी. देवीदास इंगोले, महसूल मंडळ अधिकारी संदीप जैसवाल, तलाठी शरद पाटील, महावितरण तर्फे अभियंता सुहास चौधरी, हेमंत खांडेकर आदी उपस्थित होते.

*सावदा येथे कबरस्थान साठी नियोजित जागेवर वॉल कंपाऊंड सह विविध सुविधा होऊन मिळावी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुस्लिम शिवसैनिकांची मागणी*

तसेच या ठिकाणी सावदा शहरातील मुस्लिम बांधव सह मुस्लिम शिवसैनिकांनी आमदार निधीतून मस्कावद रोड लागत कब्रस्तानसाठी नियोजित जागेवर आरसीसी वॉल कंपाऊंड, रस्ते, पाणी ची सुविधा, जनाजा नमाज पठाण साठी एक पत्री सेट इत्यादी विषय आमदार निधीतून मार्गी लावण्यासाठी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर शेख नाजीम शेख नजीर शेख इरफान शेख इक्बाल शब्बीर खान अयुब खान हुसेन खान तडवी हसन तडवी उर्फ फौजी चांद खा मेहता का खा फौजी शकील शाह इत्यादीच्या सह्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close