ताज्या घडामोडी

इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया क्षेत्रात मोठी स्पर्धा असतानाही ‘मंडे टू मंडे’ ने आपले सातत्य टिकविले : मुख्याधिकारी जोशी*

*इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया
क्षेत्रात मोठी स्पर्धा असतानाही ‘मंडे टू मंडे’ ने आपले सातत्य टिकविले : मुख्याधिकारी जोशी*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा : – जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे २१ वर्षांपासून भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरणारे परखड निर्भिड मराठी वृत्तपत्र “मंडे टू मंडे” च्या २१ व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मोजक्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कोरोनाचे सर्व नियम पाळून हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विशेषांकाचे प्रकाशन नगरपालिका मुख्याधिकारी श्री. सौरभ जोशी, सावदा नगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. रंजनाताई भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी सौरभ जोशी म्हणाले की ‘मंडे टू मंडे’ च्या माध्यमातून सातत्याने उत्कृष्ट समाजप्रबोधनाचे काम सुरू आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व गोष्टी ‘मंडे टू मंडे’ च्या माध्यमातून होत आहेत. आजच्या काळात सर्वच क्षेत्रांत विश्‍वासार्हता फार महत्त्वाची असून, आज ‘मंडे टू मंडे’कडे एक विश्‍वासार्ह वर्तमानपत्र म्हणून बघितले जाते. ‘मंडे टू मंडे’ने आजपर्यंत जी वाटचाल केली आहे, तशीच वाटचाल भविष्यातही सुरू राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया या क्षेत्रांत आज मोठ्या प्रमाणात स्पर्धा असताना देखील ‘मंडे टू मंडे’ ने आपले सातत्य टिकविले आहे. २१ वर्षे अन्याय व अत्याचारास वाचा फोडत निर्भीर्ड पणे आपले तत्त्व व सामाजिक बांधिलकी जपली आहे, ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. या २१ वर्षांत बातमीतील विश्‍वासार्हता ‘मंडे टू मंडे, ने टिकविली असून, भविष्यातही हीच विश्‍वासार्हता टिकून राहील, अशी मला खात्री वाटते असे सौरभ जोशी यांनी सांगितले.

शिक्षण समिती सभापती तथा नगरसेविका सौ. रंजना भारंबे म्हणाल्या, इतकी वर्षे राजकारणात व पत्रकारितेत ज्या पद्धतीने भानुदास भारंबे यांनी काम केले आहे, तितकाच त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मीही घेत असते, ‘मंडे टू मंडे’च्या प्रारंभीच्या काळात कसा संघर्ष केला, हे मी सुरवातीपासून बघत आहे. मंडे टू मंडे न्युज च्या माध्यमातून डिजिटल मीडियातही सर्वत्र आपली एक छाप पाडली आहे. २१ वर्षांपासून संपादक भानुदास भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने त्यांची टीम काम करते आहे, हे गौरवास्पद आहे.

‘ मंडे टू मंडे’च्या या २१व्या वर्धापनदिन अंकाच्या छोटेखानी प्रकाशन सोहळ्यास सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, पालिकेच्या शिक्षण सभापती सौ,रंजना भारंबे, माजी नगरसेवक व मंडे टू मंडे चे संस्थापक संपादक भानुदास भारंबे, सावदा पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ शहा, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, फरीद शेख, प्रदीप कुलकर्णी, सकळकर सर, संतोष परदेशी आदी पत्रकार उपस्थीत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close