ताज्या घडामोडी

महाड पूरग्रस्तांना शिवक्रांती सामाजिक संस्थेचा मदतीचा हात

महाड पूरग्रस्तांना शिवक्रांती सामाजिक संस्थेचा मदतीचा हात

नेरळ :दिपक बोराडे
महाड येथे झालेल्या पूरपरिस्थिती मध्ये अनेक घरे उध्वस्त झाली , अनेक सामाजिक संस्था व संघटना यांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जप्त महाड येथील खरवली या गावात जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
२२ जुलै च्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुले मुंबईसह कोकण , सांगली , कोल्हापूर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वित्त हानी तसेच जीवित हानी देखील झाली अनेकांची घरे उध्वस्त झाली. या अशा परिस्थितीत या नागरिकांना मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व संघटना यांचे हात पुढे सरसावले. या सर्वांच्या मदतीने या पूरग्रस्तांना थोड्या फार प्रमाणात जगण्यासाठी धीर मिळाला.
शिवक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कर्जत तालुक्याच्या वतीने मंगळवारी महाड येथील खरवली गावातील शिवसमर्थ नवीन वसाहत व संवाद बौद्धवाडी येथील पूरग्रस्तांना धान्यकिट व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे तालुका अध्यक्ष अविनाश भोईर , उपाध्यक्ष ओंकार राऊत, सचिव अमोल पाटील , संपर्क प्रमुख सागर हिसालगे, यश बाबरे,नितीन पारधी, किशोर निकम ,सतीश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close