ताज्या घडामोडी

स्टार हेल्थ कंपनीकडून क्लेमची संपूर्ण रक्कम देण्यास नकार*

*स्टार हेल्थ कंपनीकडून क्लेमची संपूर्ण रक्कम देण्यास नकार*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

भारतात अगोदरच कोरोना माहामारी आणि लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेले नागरिकांना विमा कंपन्यांकडून सुद्धा आता विम्याची रक्कम देण्यास नाकारत असून गरजू नागरिकांच्या अडचणीत अधिक भर घालत आहे..
आजारपणात, अडी- अडचणीच्या काळात उपयोगी पडावी म्हणून आजकाल सर्वसामान्य नागरिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढण्याकडे वळले होते व आहेत. घरातील कर्ता व्यक्ती अंथरुणावर खिळल्यावर दुसऱ्याकडे हात पसरविण्यापेक्षा विमा कंपनी आपल्याला मदत करेल ही अपेक्षा या कोरोना कालखंडात फोल ठरली आहे. याचे बोलके उदाहरण असे,

जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील उपशिक्षक सचिन सकळकळे यांनी स्टार कंपनी ची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली. गेल्या एप्रिल मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड सदृष्य लक्षणा मुळे भुसावळ येथील साईपुष्प कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असता. त्यांची प्रकृती खुप खालावत चाललेली बघून तातडीने यशस्वी उपचार देखील केलेत. डिस्चार्ज मिळाल्यावर जेव्हा सचिन सकळकळे यांनी सदरील स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी कडे १ लाख २१ हजार ७७८ रूपये.चे बिल मिळावे म्हणून सर्व ओरिजिनल हॉस्पिटल, मेडिकल बिलांसह अर्ज दाखल केला परंतु कंपनी कडून त्यांना फक्त सुरुवातीला ९ हजार ३३१ रुपये आणि ग्रिवियन्स कडे तक्रार दाखल केल्यानंतर १० हजार ६६९ रुपये असे फक्त एकूण २० हजार रुपये मंजूर केले. व बाकीची इतर रक्कम न देण्यासाठी गैरवाजवी भूमिका घेतली आणि तुम्ही कोविड सेंटर ला का गेलात? तुमची प्रकृती इतकी गंभीर नव्हती, तुम्हाला २४ तासापेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशनची गरज नव्हती असे कारण देऊन उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली आणि क्लेम नामंजूर करून तुम्हास जिथे तक्रार करायची असेल तिथे करा अशी धमकी वजा उद्धट भाषा वापरली गेली. त्यानुसार सचिन सकळकळे यांनी आयआरडीए कडे तक्रार दाखल केली होती परंतु तिथे त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे बिमा लोकपाल, पुणे यांच्या कडे न्याय मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. आता किमान बिमा लोकपाल कडे तरी न्याय मिळतो का याची प्रतीक्षा आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close