ताज्या घडामोडी

रावेर येथे माऊली रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्म : आईसह तिन्ही बाळ सुखरूप..!*

*रावेर येथे माऊली रुग्णालयात महिलेने दिला तिळ्यांना जन्म : आईसह तिन्ही बाळ सुखरूप..!*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील तालुका असलेल्या रावेर येथे बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्गावर माउली रुग्णालयात एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला देव कृपेने डॉक्टरांच्या मेहनत व मदतीने महिलेची नॉर्मल प्रसूती झाली असून तीन मुलां सहीत आईची तब्येत चांगली आहे. याबाबत नातेवाइकांना माहिती मिळाली असता रुग्णालयात पाण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की रावेर शहरातील मन्यार वाड्या भागात रहिवाशी अमरीन बी शेख मुस्‍तकीम वय २२ या महिलेस प्रसवपीडा जानू लागल्याने त्याला थेट माउली रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. सदर महिलेची प्रकृती बघता नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे संकेत दिसत नव्हते. परंतु यावेळी डॉक्टर संदीप पाटील यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीन बी ची देव कृपेने नॉर्मल प्रसुती केली. परिणामी दुपारी १.२२ वाजेच्या सुमारास अमरीन बी यांनी तिळ्यांना जन्म दिला. जन्मास आलेले तिघेही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. याबाबतची माहिती नातेवाईकांना मिळाली असता रुग्णालयात त्यांनी पाण्यासाठी एकच गर्दी केली होती. मेहनत घेऊन डॉक्टर संदीप पाटील सह कर्मचारी यांनी महिलेची देव कृपेने नॉर्मल डिलिव्हरी केली असता त्यांचा सर्वत्र कौतुक केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close