ताज्या घडामोडी

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला -जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला -जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – राज्य सरकारने ब्रेक द नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत मोठा खुलासा केलाचेन अंतर्गत कोरोना निर्बंध शिथीलतेचे आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मागील बैठकीमध्ये जिल्ह्यातील निर्बंध आहे तसेच कायम ठेवण्याचा निर्णय झालेला होता. दरम्यान शासनस्तरावरून नव्याने काही निर्देश आल्यास ते जिल्ह्यात लागू करण्यात येतील असेही ठरविणेत आले होते. त्याप्रमाणे शासनाकडून प्राप्त वरील आदेश जिल्ह्यात जसेच्या तसे लागू करण्यात येत आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हे नियम लागू होणार

सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.

सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना

जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना.

सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही.

राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.

शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत

मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close