ताज्या घडामोडी

जे डी जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…

नवी मुंबई / प्रतिनिधी : –

जे डी

जय दादा युवा मंच ,महाराष्ट्र राज्य कडून पुरग्रस्थाना मदतीचा हात…

त्यांच्या टीम कडून पुरग्रस्थ भागात जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन त्यांना इंजेकशन व औषध आणि मेडिकल किट चे वाटप केले आणि गरजूंना राशन किट आणि पाण्याचे देखील वाटप केले .महाड तालुक्यातील भोरव गावा,चिपळूण मध्ये खेर्डे,आणि चिपळूण बाजारपेठ मधील व्यापारी आणि नागरिक यांना मेडिकल किट,राशन किट आणि पाणी आदीचे वाटप कार्यकर्त्यां कडून करण्यात आले .त्यावेळी तेथील नागरिकांनी ह्या संस्थेचे व टीम चे आभार मानले तिथ पर्यंत मेडिकल कॅम्प आता पर्यंत कोणी केला नव्हता ह्यावेळी बोलताना तेथील ग्रामस्थांचे अश्रू अनावर झाले होते आपण आमच्या आरोग्य साठी आलात आपण आमच्या इथे देवा सारखे आलात अशी भावना त्यांच्या कडून व्यक्त झाली.मागच्या वेळेस देखील अशीच कामगिरी ह्या संस्थे कडून पश्चिम महाराष्ट्र ला मदत करण्यात अली होती .
आधी जयकुमार डिगोळे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून आले होते त्यावेळी तेथील परिस्थिती खूप बिकट होती आणि नंतर १ दिवस महाड आणि १ दिवस चिपळूण असा नियोजन करून ३१ जुलै व १ ऑगस्ट या रोजी मेडिकल कॅम्प ठेवण्यात आला त्यात त्यांना मोलाचे सहकार्य हे साई समर्थ हॉस्पिटल चे रुपेश वडगावकर डॉक्टर यांनी केले.आणि कामोठ्यातील समाजसेवक रवि गोवारी आणि पनवेल नगरसेविका सौ हेमलता रवि गोवारी यांनी देखील साथ दिली.आणि या संस्थे चे संस्थापक/अध्यक्ष जयकुमार डिगोळे,प्रशांत मिश्रा,आशितोष सोनवणे,संदीप भांगे,ऋषिकेश हिर्लेकर कामोठ्यातील समाजसेविका सौ संगीता राऊत , सोनल तांबे आणि साई समर्थ हॉस्पिटल चे संपूर्ण टीम ह्या वेळेस उपास्थित होते.
आम्ही मदत नाही केली तर कर्तव्य निभावले आहे तर आपण देखील ते निभवा असे आवाहन जयकुमार डिगोळे यांनी केले.

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close