ताज्या घडामोडी

सावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…!*

सावद्यात मनाली हॉटेल व बियर बारातून मोठ्या प्रमाणात दारु व बियर चोरट्यांनी केली लपास…!*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्गावरील सावदा – फैजपूर रोडवर असलेल्या मनाली हॉटेल परमिट रूम आणि बियर बार मध्ये दिनांक २९ जुलै रोजी रात्री चोरट्यांनी दरोडा टाकून येथील सर्व दारू व बियर चे बाकस चोरून नेल्याची घटना घडलेली आहे.

यात लाखाच्यावर किमतीच्या दारू व बियर चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. सदरील हॉटेलच्या उत्तर बाजूची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसेच यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दारु बियर चे संपूर्ण बाकस सहीत डीव्हीआर ही सोबत चोरून नेले. सदरची घटना पहाटे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

यानंतर मनाली हॉटेलचे संचालक मनोज नेमाडे व विनोद नेमाडे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी, पंकज येवले, सागर बेंडाळे हे घटनास्थळी हजर झाले. सदरील चोरीची घटना बाबत माहिती मिळाल्यावर सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले,सह उमेश पाटील, संजीव चौधरी, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

विशेष

सध्या सावद्यात रात्री होणार्‍या चोरीच्या घटना कासवाच्या गतीने का होईना परंतु वाढत असल्याने .” जोर का झटका धीरे से लगे” यानुसार चोरटे येथील पोलिसांना एक प्रकारे चोऱ्या करून थेट आव्हान उभे करीत आहे. असाच एक प्रकार गेल्या १ वर्षापूर्वी लोकडॉन काळात रावेर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये झाला असता पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद देणारेच परिणामी चोर निघाले होते. परंतु पोलिसांनी सध्या रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close