ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

येवला तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी 10 गावातील आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप करून जयंती साजरी करण्यात आले याप्रसंगी येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांचे विचार व त्यांचा संघर्ष त्यांनी समाजासाठी केलेले कार्य चिरंतर प्रेरणादायी राहील त्यांनी केलेला संघर्ष हा आपल्या आदिवासी बांधवांसाठी खूप मोलाची शिकवण आहे संघर्ष शिवाय काहीच मिळत नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे यांचे विचार आदिवासी बांधवांनी आत्मसात करावे असे आव्हान सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले आपण खावटी अनुदान आपणाला मिळवून देण्यासाठी चार महिन्यापूर्वी प्रत्येक गावांमध्ये यादी तयार करून शासनाला पाठवली होती आज आपल्याला अनुदान प्राप्त झाला आहे परंतु आजही काही लोक हे अनुदानापासून वंचित आहेत ह्या अनुदानामुळे आपली दोन दिवसाची भूक भागू शकते परंतु आपण ह्या अनुदानावर जगू शकत नाही त्यामुळे शासनाकडून आपली असलेली मूळ मागणी आपण कसत असलेल्या गायरान जमीन वन जमीन या शासनाने तात्काळ नावे करण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला संघर्ष मोठा करावे लागेल आपल्या जमिनी आपल्या नावावर झाल्यास आपल्याला अशा खावटी कर्जाची आवश्यकता भासणार नाही असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले त्यामुळे आपण देणारे मुलं तयार करा आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून या तालुक्याचा तहसीलदार या तालुक्याचा गट विकास अधिकारी जिल्ह्याचा कलेक्टर जेव्हा आपल्या मुलं होतील तेव्हाच आपल्या पिढीचा उद्धार होऊ शकतो त्याकरता समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांसाठी संघर्ष केला पाहिजे असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले याप्रसंगी उपसभापती मंगेश भगत आश्रम शाळेचे प्राचार्य विजय चव्हाण नंदकिशोर सांगळे संभाजी वाकचौरे बेडके मंदा देवरे प्रतिक विधाते प्रीती संदीप पैठणकर गणेश सोनवणे कोल्हे संजय सर संतोष निकम बल्हेगाव च्या सरपंच ताई कापसे ताई रमेश सोनवणे मारुती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close