ताज्या घडामोडी

शिलारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.. नेरळ : दिपक बोराडे

शिलारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

नेरळ : दिपक बोराडे

आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली शिलारवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
रविवारी 1 ऑगस्टला पोसरी शिवतीर्थ येथील कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिलार तेथील ग्रामपंचायत सदस्य विष्णू कांबडी, वामन हिंदोला, गणेश भगत, शंकर हिंदोला, दिनेश भगत, बुधाजी शेंडे, अरुण शेंडे, एकनाथ हिंदोला, योगेश शेंडे, कृष्णा हिंदोला, माधव शेंडे, यशवंत शिंगवा यांसह अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, विभाग प्रमुख बाजीराव दळवी, मा उपसभापती मनोहर थोरवे, उत्तम शेळके, शिवराम बदे,अनिल शेमटे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close