ताज्या घडामोडी

सावदा पालिकेच्या ईमारतीवर सोलर पेनल लावण्याचे काम सुरु – लाखोंच्या वीजबिलाची होणार बचत*

*सावदा पालिकेच्या ईमारतीवर सोलर पेनल लावण्याचे काम सुरु – लाखोंच्या वीजबिलाची होणार बचत*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका आता वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून येथील
पालिकेच्या ईमारतीवर सोलर पेनल बसविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. याव्दारे
संपूर्ण पालिका इमारतीमध्ये विज मिळणार प्राप्ती होणार असून नगरपालिकेचे दरवर्षी येणारे
लाखो रूपयांचे विज बिलाची बचत होणार आहे.

याबाबत वृत्त असे कि, सोलर पॅनल बसवीने बाबत नगरपालिका सभेत ठराव
मंजूर झाल्यावर याबाबत निविदा काढण्यात येऊन एका संस्थेस हे काम देण्यात
आले असून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम करण्यात येत आहे. पालिकेच्या
इमारतीवर हे ग्रिड कनेक्टर सोलर बसविण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर
संपूर्ण पालिकेचा असणारा विज पुरवठा हा सोलर च्या माध्यमातून होईल. यामुळे
पालिकेची वर्षाकाठी होणारे लाखो रूपयांचे विजबिलाची मात्र बचत होणार आहे,

पालिकेस दर महिन्याला सदर नवीन इमारतीचे बिल १२ ते १३ हजार रुपये इतके
येत असते याप्रमाणे एका वर्षात सुमारे १ लाख ५० हजार रूपयांचे इतके विज बिल
पालिका महावितरण कंपनीस भरते मात्र ही सोलर पेनल यंत्रणा कार्यन्वित
झाल्यावर वर्षाकाठी पालिकेची सुमारे दीड लाख रूपयांची विज बिल बचत होणार
आहे, व सोलर पेनल बसून स्वःताची विज निर्मिति करणारी बहुधा सावदा नगरपालिका ही
जिल्ह्यातील पहिलीच ठरणार असल्याचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी यांनी
सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close