ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी लासलगावी गुन्हा दाखल*

*अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी लासलगावी गुन्हा दाखल*

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

लासलगाव प्रतिनिधी/राहुल वैराळ

*लासलगाव दि३०-* अल्पवयीन मुलीच्या विवाह प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाहास बंदी असतानाही या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे
याबाबत टाकळी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी शशिकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 29 रोजी लासलगाव जवळ टाकळी विंचूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात बालविवाह प्रतिबंध असतानादेखील अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यात आला या प्रकरणात पुरोहित, वधूचे वडील वधूची आई, वराची आई( सर्व राहणार लासलगाव) वराचे मामा (रा.टाकळी विंचुर) यांनी बालविवाह प्रतिबंधक असतानाही अल्पवयीन मुलीचा विवाह केला म्हणून त्यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम अनुसार ९,१०,११,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या घटनेचा पुढील तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ठोंबरे व तपासी अंमलदार पोलीस नाईक एस. शिंदे तपास करत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close