ताज्या घडामोडी

*माजी आमदार भाई डॉ गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी ; महादेवाला घातला अभिषेक*
====================

सांगोला /विकास गंगणे-

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते गोरगरीबांचे कैवारी माजी आमदार भाई डॉ गणपतराव देशमुख यांची प्रकृतीत चांगली सुधारणा व्हावी तसेच तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हावे आणि त्यांना दिर्घायुषी लाभावे यासाठी वाढेगांव येथील त्रिवेणी संगमावरीलमहादेवाला शेकाप कार्यकर्ते व ग्रामस्थाकडून अभिषेक घालण्यात आला
भाई गणपतराव देशमुख यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांनी पित्ताशयातील खडे काढून सर्जरी केली परंतु अचानकच त्यांची प्रकृती खालावत चालल्याने सांगोला तालुक्यांमध्ये सलग 11 वेळा विजय संपादन करून 55 वर्षे आमदारकीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कशाचीही आशा न बाळगता गोरगरीबाची सेवा केली अशा देवमाणसास दिर्घायुषी लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना वाढेगांव येथील कार्यकर्त्यानी महादेवाला अभिषेक घालून केली आहे. अश्वीनी हॉस्पीटलच्या डॉ रुद्रा यांच्या माहितीनुसार माननीय आमदार भाई डॉ गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी नातेवाईकांना व कार्यकर्त्यांना सांगितले आहे
या अभिषेक प्रसंगी डॉ. मधुकर दिघे विक्रम लवटे ग्रा पं सदस्य नारायण दिघे पांडुरंग डोईफोडे भारत हजारे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष तानाजी भोसले बबलू घोंगडे सिताराम ऐवळे प्रवीण घोंगडे सिद्धेश्वर मेटकरी संजय डोईफोडे बिरा डोईफोडे अर्जुन डोईफोडे श्रीकांत लवटे संतोष चौगुले सचिन डोईफोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close