ताज्या घडामोडी

*सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला*

*सावदा डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात हाजी इक्बाल शेख हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशन द्वारे संचालित डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दी.२९ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता इतरांना हेवा सुटेल अशा प्रकारे शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षरोपण करण्यात आले. या निमित्ताने शाळेत एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.

यावेळी सदरील शाळेची वाटचाल कौतुकास्पद असून भविष्यात ही शाळा अजून मोठा यशाचा टप्पा गाठेल. वृक्षारोपणाची गरज व त्याचे महत्व काय याविषयावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आले. तसेच सावदा सारख्या ग्रामीण भागात स्वतःच्या खर्चाने शाळेसाठी अद्यावत व संयुक्त सुंदर भव्य इमारत उभारून विद्यार्थ्यांना नाम मात्र फिवर चांगल्या व उत्तम दर्जाची शिक्षण सुविधा सदरील संस्थेचे सचिव हाजी हारून शेख इक्बाल यांनी उपलब्ध करून दिली. काळाची गरज ओळखून शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करून अतिशय कौतुकास्पद कार्य केल्याचे या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. शुभेच्छा ही दिल्या.

याप्रसंगी सावदा शहराची प्रथम नागरिक व नगराध्यक्षा आनिता पंकज येवले, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी, डॉक्टर अजित कुमार पाटील, डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव हाजी हारून शेठ, हाजी अजमल सेठ, नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू शेठ, नगरसेविका करुणा पाटील, नगरसेविका सगीर बी सैय्यद तूकडू, नगरसेविका शबाना मुराद तडवी, नंदू पाटील सर, असलम जनाब, गौस खान सर, अली हैदर खान उर्फ शाईस्ता सर, कृ. उ. बाजार समिती सदस्य सैय्यद अजगर, अजमल खासाब, इलियास सैय्यद, पत्रकार साजिद शेख, शाम पाटील, लाला गोष्टी, पिंटू कुलकर्णी, हमीद कमांडो, एडव्हकेट जावेद शेख, इलियास टेलर, नईम मोबाइल,सह डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचा शिक्षक स्टॉप उपस्थित होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close