ताज्या घडामोडी

सावदा येथे गौसियानगरात बंद घराचे कुलूप तोडून ४० हजारांच्या ऐवज नेला चोरुन!*

*सावदा येथे गौसियानगरात बंद घराचे कुलूप तोडून ४० हजारांच्या ऐवज नेला चोरुन!*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गौसिया नगर भागात एका घराच्या कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी जोर जवळपास चाळीस हजार रूपे चोरून नेल्याची घटना घडलेली आहे.

अधिक माहिती अशी की. गौसिया नगर मधील रहिवासी शेख जावेद शेख अबू-तालिब याच्या संपूर्ण कुटुंब दी.२६ जुलै रोजी घराला कुलूप लावून मोठा वाघोदा येथे नातेवाईकांच्या घरी क्रियाच्या कार्यक्रमात गेले होते.

परिणामी क्रिया चे कार्यक्रमा अपटून सावदा येथे परत आल्यानंतर त्यांच्या राहत्या घराचे दरवाजेवरील कुलूप तुटलेल्या अवस्थेत प्रथम दर्शनी दिसून आल्याने सदरील घर मालक घराच्याआत गेल्यानंतर कपाट उघडलेल्या अवस्थेत होती आणि कपाट मधील लाकर सुद्धा तुटलेला असून त्यातील ठेवलेले जवळपास ४०हजार रुपये गायब होते.

घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याची संधी उचलून अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून सदरची रक्कम वर हात सफाई केली.सावदा पोलिस ठाण्यात माहिती देऊन या प्रकरणाची नोंद करण्यात आलेली थेट घटनास्थळी एपीआय देविदास इंगोले सह पोलीस कर्मचारी यांनी चौकशी व पंचनामा केला. पुढील तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close