ताज्या घडामोडी

आश्चर्यजनक:- सावदा येथे अवैधरित्या पंप टाकून बायोडिझेलची विक्री करणारे अद्याप मोकाट : यंत्रणेला गुन्हा दाखल साठी मुहूर्त सापडेना*

*आश्चर्यजनक:- सावदा येथे अवैधरित्या पंप टाकून बायोडिझेलची विक्री करणारे अद्याप मोकाट : यंत्रणेला गुन्हा दाखल साठी मुहूर्त सापडेना*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे संबंधित सरकारी यंत्रणेकडून कोणतीच परवानगी न घेता स्वतःच्या समरी पावरात फैजपूर ते मोठा वाघोदा दरम्यान बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्गावर बायोडिझेल चे पंप टाकून याचे मालक, चालकांकडून अवैधरित्या बिनदिक्कतपणे विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होत.
तसेच रॉकेल मिश्रित बायोडिझेलची विक्री अवैधरित्या करणाऱ्या दोन जणांना रावेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक यांच्या पोलीस पथकाने पकडून सदरील गोरख धंद्याचा भांडाफोड केल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी तहसीलदार रावेर यांना माहिती सुद्धा दिली होती.
यानंतर गेल्या गुरुवारी पुन्हा पोलिसांनी बायोडिझेल वाहतूक करणारी गाडी पकडून कारवाई करण्यासाठी महसूल विभागाच्या पुरवठा निरक्षक व सावदा मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल यांच्या ताब्यात देऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करणेकामी सांगितले. मात्र यांनी आपली जबाबदारी विसरून याप्रकरणी थेट पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी कुचकामी भूमिका घेतल्याने गुन्हा दाखल न करता पकडण्यात आलेले वाहनास सोडून दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

यानंतर “सावद्यात एक नव्हे दोन बायोडिझेल पंप: परवानगी नसताना सर्रास विक्री सुरू “या मथळ्याखाली दि.२७ जुलै २०२१ रोजी सविस्तर बातमी प्रसिद्ध केल्याने सदरील फैजपूर ते सावदा दरम्यान एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मांगे गुपित पद्धतीने अवैधरित्या सुरु असलेल्या झुलेलाल बायोडिझेल पंपाला पुरवठा निरीक्षक व सावदा मंडळ अधिकारी जैस्वाल यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार फक्त पपांस सील करण्याची कारवाई केलेली आहे.

*विशेष*

जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिनांक १६ जुलै रोजी पत्र द्वारे बायोडिझेलची उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री परवानग्या दिले नसून बायोडिझेलची अवैधरित्या करणाऱ्यांवर थेट कारवाई करणे बाबत तहसीलदार यांना सूचना देऊन सदरचा प्रकार होत असल्यास जीवन आवश्यक वस्तु अधिनियम १९५५ प्रमाणे कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. मात्र अवैधरित्या पंप टाकून “एक्सट्रा मायलेज वाला बायोडिझेल” अशी छापलेले डीजीटल बॅनर वाहनचालकांना आकर्षित करणे कामी शहरासह इतर ठिकाणी जागोजागी लावून बेधडक विनापरवानगी बायोडिझेलची विक्री करणारे दोन्ही पंप मालक चालक पोलीस ठाण्याच्या लाकप ऐवजी संबंधित यंत्रणेच्या कुचकामी भूमिकेमुळे वारेमाप कमाई करून आजही मोकाट फिरत आहे. सबब सरकारी यंत्रणेला याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासाठी मुहूर्त सापडेना असे म्हटले तरी यात गैर वाटण्यासारखे काहीच नाही.

सदरील झुलेलाल बायोडिझेल पंप अवैधरित्या रोड टच जागा ऐवजी सावदा – फैजपूर रोडवरील एका प्रसिद्ध ट्रान्सपोर्टच्या मागे गुपित पद्धतीने भाड्याने घेतलेली जागेवर चालवला जात होता. तर दुसरा पंप रावेरकडे जाणाऱ्या रोडवरील न्यू महिंद्रा धाबा समोर उघडपणे चालविला जात होता.
तसेच राज्यात रॉकेल बंदी असताना रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री चा प्रकार अतिशय चिंताजनक असून थेट सरकारी यंत्रणेला आवाहन देणारा असल्याचा विषय नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे.
म्हणून आता या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेकामी महसूल व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची अतिशय गरज आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close