ताज्या घडामोडी

खालापूर ग्रामसेवक युनियन यांच्याकडून महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

खालापूर ग्रामसेवक युनियन यांच्याकडून महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

खालापूर – समाधान दिसले

रायगड जिल्ह्यातील महाड व तालुक्यातील गावांत नुकसान झालेल्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा खालापूर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने मदत करण्यात आली.

सततच्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांत व महाड शहरात पुराचा फटका बसल्याने तेथे होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच शिल्लक राहिले नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा खालापूर, सरपंच व पंचायत समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, त्यात जास्त प्रमाणात ब्रेड, जॅम, बिस्कीट व पाणी बॉटल, तांदूळ, डाळ, माचीस, पीठ, प्राथमिक उपचार साहित्य आदी वस्तूंच्या रूपाने महाड पंचायत समितीने सुचविलेल्या पूरग्रस्त आकले, भोगाव, सोमजाईवाडी, नागलवाडीफाटा येथील १८० पूरग्रस्त कुटूंबाना मदत करण्यात आली.

यावेळी खालापूर पंचायत समितीचे उपसभापती विश्वनाथ पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, उपगटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, तांबाटी सरपंच अनिल जाधव, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, महादेव शिंदे, ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रयत्नाने ही मदत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ग्रामसेवक विजय नलावडे, कैलास मोरे, गणेश मोरे, प्रमोद पाटील, प्रल्हाद पाटील, प्रशांत कदम, सरपंच अनिल जाधव, देहू म्हामुनकर व ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी चे कर्मचारी यांनी केली. तर तर तालुका ग्रामसेवक युनियन नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आहे, अनेक आपत्तीग्रस्त ठिकाणी त्यांनी मदत केल्याचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगून ही मदत प्राथमिक स्वरूपात असून आणखी मदत जमा करून महाड येथे जाणार असल्याचे सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close