ताज्या घडामोडी

सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने नगरसेवक अमोल जाधव खोपोलीतील 150 कुटुंबाना करणार ब्लँकेट वाटप

सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने नगरसेवक अमोल जाधव खोपोलीतील 150 कुटुंबाना करणार ब्लँकेट वाटप

खालापूर – समाधान दिसले

अतीवृष्टीच्या पावसाने खोपोली शहरासह खालापूर तालुक्याला झोडपून काढल्याने या पावसाच्या पाण्याने अनेकांच्या कुटुंबाची दैना केल्याने असंख्य कुटुंबाच्या जीवनावश्यक वस्तू खराब झाल्याने बहुतांशी पुरग्रस्त कुटुंब मोठ्या संकटात सापडले असताना या कुटुंबाना मदत हात मिळावा म्हणून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी पुढाकार घेऊन मदत केली असता असाच पुढाकार खोपोलीतील नगरसेवक अमोल जाधव यांनी घेतला असून जाधव हे खोपोली शहरातील गोरगरीब 150 कुटुंबाना मायेची उब मिळावी म्हणून ब्लँकेट वाटप करणार आहेत, तर ज्यांना खरचं ब्लँकेटची गरज आहे त्यांनी अमोल जाधव यांच्याशी या +919545324222 क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून गोरगरीबांना ब्लँकेट उपलब्ध होतील.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याचा 27 जूलै वाढदिवस असल्याने यादिवशी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात, मात्र कोरोनाचे सावट व अतिवृष्टीच्या पावसाने गोरगरीबांचे केलेले अतोनात नुकसान यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना या वाढदिवस दिनी जेवढी गोरगरीबांना मदत करता येईल तेवढी करा असे आवाहन करताच सर्वाना या सुचनेचे पालन करीत गोरगरीबांना मदतीचा हात दिल्याचे पाहायला मिळाले.

27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपोली शहर शिवसेना, युवासेना, महिला आघाडीची बैठक पार पडली असता या बैठकीत गोरगरीबांना मदत करण्याचे एकमत होताच खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक अमोल जाधव यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने 150 कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्याचे निर्धार केला असून खोपोली शहरातील ज्या गोरगरीबांना खरचं ब्लँकेटची गरज आहे त्यांनी, नगरसेवक अमोल जाधव या +919545324222 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक जाधव यांनी केली.

तर नगरसेवक अमोल जाधव यांनी याबाबत आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, ज्या समाजात आपण जन्म घेतो – वावरतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो तसेच आईवडीलांकडून मिळालेली समाजसेवेचे शिक्षण या जोरावर मी माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीत असून पुढील काळात माझ्याकडून समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरु राहून गोरगरीबांना मदत हात देण्याचा प्रयत्न करेन असे मत नगरसेवक अमोल जाधव यांनी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close