ताज्या घडामोडी

खोपोलीतील रमाधाम वृध्दाश्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळस चढवला – विधानसभा उपसभापती शिवसेना उपनेत्या निलमताई गोर्हे

खोपोलीतील रमाधाम वृध्दाश्रमाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळस चढवला – विधानसभा उपसभापती शिवसेना उपनेत्या निलमताई गोर्हे

खालापूर – समाधान दिसले

मॉसाहेब मिनाताई ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रमाधाम वृध्दाश्रमाचा पाया रचला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खोपोलीतील रमाधाम वृध्दाश्रमाचा कायापालट करीत सुवर्ण कळस चढवला हे वृध्दाश्रम सेवाभाव कायम ठेवत रमाधाम वृध्दाश्रमाचा सेवा कार्यरत ठेवण्याचे काम रमाधामचे अध्यक्ष चंदू मामा वैद्य यांनी केले आहे.

वृद्धांची सेवा मनोभावे केरीत अतिशय चांगलं उदाहरण दिलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलैला आहे, तरी उत्सव समारंभ करायचा नाही. परंतु कोरोना मुक्तता व्हावी आणि ती मुक्तता गावाची – राज्याची – देशाची – जगाची व्हावी या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न चालले आहेत. राज्यांमध्ये तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य चिंतीत असताना कोरोना मुक्तीसाठी मुख्यमंत्री यांचे प्रयत्न केले त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन तर त्यांचे आभार मानते असे उदगार महाराष्ट्र राज्य विधानसभा उपसभापती शिवसेना उपनेत्या निलमताई गोर्हे रमाधाम वृध्दाश्रम भेट 26 जुलै रोजी दिली असता काढले.

यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा उपसभापती शिवसेना उपनेत्या निलमताई गोर्हे, रमाधाम वृध्दाश्रमाचे अध्यक्ष चंदू मामा वैद्य, निर्मला जोशी, शिवसेना देवगड संपर्क प्रमुख अनिरुद्र नाडकर, माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, महीला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई ठाकरे, उपजिल्हा संघटीका निलम चोरगे, खोपोलीच्या माजी नगरसेविका तथा शहरसंघटीका प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, तालुका संघटीका रेश्मा आंग्रे, अनिता पाटील आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने महीला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना नीलमताई गोर्हे पुढे म्हणाल्या की, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पूजा करायच्या मूर्ती सुद्धा येथे जतन केलेले आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की माॅ साहेबांचा आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद देण्याचं काम या भागांमधून होते .हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण राज्यामध्ये महीलांना सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून योजना राबवल्या जात आहेत. असे उपसभापती शिवसेना उपनेत्या निलमताई गोर्हे यांनी सांगितले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close