ताज्या घडामोडी

महाड पुरग्रस्तांच्या मदतीला खालापूर तालुका शिवसेना

महाड पुरग्रस्तांच्या मदतीला खालापूर तालुका शिवसेना

खालापूर – समाधान दिसले

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या पूरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने अनेकांनपुढे मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असताना महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना मदतीची गरज असताना ही गरज ओळखून शिवसेना खालापुर तालुक्याच्या वतीने मदतीचा हात पुढे करीत 27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही मदत करण्यात आल्याने मदत मिळालेल्या कुटुंबानी शिवसेना खालापूर तालुक्याच्या कार्याचे कौतुक केले.

महाडमधील अस्मानी संकटात सावरण्यासाठी वेळ लागणार असला तरी सध्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेता कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खालापूर तालुक्याचे जेष्ठ मंडळी एकत्र येत महाडकरांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्या अनुषंगाने शिवसेना खालापूर तालुक्याच्या वतीने 27 जुलै महाडकर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

याप्रसंगी शिवसेना सल्लागार गोविंद बैलमारे, सल्लागार शशिकांत देशमुख, तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, संपर्कप्रमुख उमेश गावंड, प्रवक्ते सुरेश देशमुख, प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, चिटणीस प्रसाद देशमुख, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे, एस.एम.पाटील, चिंतामण चव्हाण, अनिल सानप, जनार्दन थोरवे, अमित देशमुख आदीप्रमुखासह शिवसैनिक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close