ताज्या घडामोडी

नाशिक मधील आबेङकरी चळवळीचा चंद्रभान् पगारे नावांचा ज्वालामुखी शांत झाला… संपादक शांतारामभाऊ दुनबळे पोलीस टाईम्स न्युज परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

नाशिक मधील आबेङकरी चळवळीचा चंद्रभान् पगारे नावांचा ज्वालामुखी शांत झाला…

संपादक शांतारामभाऊ दुनबळे पोलीस टाईम्स न्युज परिवार वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

२५जुलै, चंद्रभान पगारेंच्या मृत्युची बातमी कळाली. मनाला फार वेदना झाल्या. क्षणभर विद्रोहाची त्सुनामी संपल्याचा भास झाला. जिवनात खरा संघर्ष कसा असतो, हे पॅन्थर चंद्रभान दादांच्या जिवन पटातुन दिसुन येते. नाशिकच्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास पगारे परिवाराला सोडुन लिहीताच येणार नाही. दिंडोरी गावातुन वडील हरीबाबा व आई चंद्रभागा हे नाशकातील घारपुरे घाट रूंग्ठा हायस्कूल मागील राजवाड्यात रहिवासले. त्यांना सात मुलं-शंकर, प्रतापराव, चंद्रभान, घनश्याम, भास्कर, संपतराव, आणि विजयराज व तीन मुली झाल्या. मिळेल ते काम करून आई वडील मुलांचे संगोपन करत होते.
पगारे परीवाराची समाजाप्रती असणारी आस्था/प्रेम/जिव्हाळा आणि वेळप्रसंगी बलिदान देण्याची मानसिकता त्यामुळे नाशकात पगारेंमुळे निर्माण झालेला अदबयुक्त दरारा खरंच समाजाची कवच कुंडलं वाटतात.
मल्हारखान नाशिक शहरातील अतिशय वर्दळीच ठिकाण. जिल्हा कचेरी व कोर्ट हाकेच्या अंतरावर, अशोक स्तंभ जिल्ह्याचा केंद्रबिंदू. मल्हारखान जिल्हा पशुवैद्यकिय दवाखान्याच्या भिंती लगत 1972 साला पासुन झेप घेणार्या चित्याच्या फोटोचा दलित पॅन्थरचा बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. तिथेच निलकमल पानस्टाॅल चळवळीच्या कार्यकर्त्यांचा कट्टा, त्याचा शिलेदार-बलदंड देहयष्टी, गोरापान, राजबिंडा, आश्वासक वाटणारा हक्काचा माणूस म्हणजेच-चंद्रभान पगारे, नाशकात कुठेही समाजावर अन्याय अत्याचार होवो त्याचा प्रखर कडवा विरोध चंद्रभान पगारेंनी आयुष्यभर केला. समाज रक्षणासाठी कधीही जिवाची परवा केली नाही. पठाणी पेहराव,कानात पगरं, निधडी छाती बघितली की आंबेडकरी समाज जागृत असल्याचं वाटायचं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजातील कुणाचाही मोर्चा/उपोषण असो आपल्या फौज फाट्यासह चंद्रभान दादा हजर रहायचे. चुकीचे समर्थन न करणारा हा विद्रोही पॅन्थर कोणत्याही दडपणाला कधीच बळी पडला नाही.मल्हारखान च्या अगदी समोर एक भव्य वार्ताफलक सर्वांनाचे लक्ष वेधून घेत असे. त्या बोर्डावर काय बातमी झळकेल याची सर्वांना उत्सुकता असायची. प्रशासनाच्या उरात धडकी भरवणार्या ठळक बातम्या पॅन्थरच्या बोर्डावर असायच्या. चंद्रभान दादांचे शेकडो बोर्ड जप्त झाले. पण रातोरात दुसरा बोर्ड तयार करून लोकांना बातमी दिसणारच अस चक्र शेवट पर्यंत सुरू ठेवणारा विद्रोही पॅन्थर शोधुनही सापडणार नाही. चंद्रभान पगारेंनी ऐन ऊमेदिच्या काळात सरकारी नोकरी सहजपणे लागत असतांना त्यांना लाथाडुन दादासाहेब गायकवाडांच्या प्रेरणेने बाबासाहेबांनाच आपल सर्वस्व माननार्या पॅन्थर चंद्रभान पगारेंनी भलेही धन-दौलत कमावली नसेल परंतु समाजातील अनेकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे चंद्रभान पगारे नेहमी अमर राहतील. राजा ढाले, नामदेव ढसाळ, ना.रामदास आठवले, प्रा. कवाडे सर, हाजी मस्तान, ज. वि. पवार, भाई तानसेन नन्नावरे, अर्जुन डांगळे, ही सर्व मोठी नेते मंडळी दादांच्या घरी येउन त्यांचा उत्साह वाढवत असत.
दांडेकर तालमीत पहिलवान सावळीराम दोंदे, मोहन प्यारे, यांच्या सोबत भिमसैनिकांना कुस्ती/दांडपट्टा/तलवार बाजीचे धडे देणारा चंद्रभान दादा सदैव आमच्या मनातच राहतील. ‘जयभीम के मारे हुए खंजर से कोई बच नही सकता, दवाओसे क्या वो दुआवोसेभी बच नही सकता. ही आवडती डरकाळी फोडणारा, आपल्या भाषणानातुन आग ओकणारा, नेहमी समाजाची ढाल म्हणून पुढे आलेला आपला दादा वयाच्या ऐंशीव्या वर्षी एक्झीट घेत निघुन गेला. त्यांच्या पवित्र स्मृतींना माझा क्रांतिकारी निला सलाम, व विनम्र अभिवादन…🙏🙏🙏( लेखक-: .अविनाश गायकवाड,लहवित. नाशिक)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close