ताज्या घडामोडी

कोविड लस नगरसेवक निधीतून घ्या – नगरसेवक गुरुमीत बग्गा यांची मनपा आयुक्तांकडे मागणी*

*कोविड लस नगरसेवक निधीतून घ्या – नगरसेवक गुरुमीत बग्गा यांची मनपा आयुक्तांकडे मागणी*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

नाशिक – नगरसेवक निधीमधून प्रत्येकी दोन हजार कोविड प्रतिबंधक लसही खरेदी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी पत्राव्दारे नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे..

नाशिक महापालिकेने कोविड संकटात उत्तम कामगिरी करून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण समर्थपणे कोविडविरोधात यंत्रणा उभी करू शकलो. आता लवकरच कोविडची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बजाव करायचा असेल तर कोविड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. नाशिक शहरात अत्यंत कमी प्रमाणावर लस उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीत लोकांचे जीव वाचविणे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.. म्हणून नगरसेवक निधीमधून आपण प्रत्येकी दोन हजार लस विकत घेतल्या तर नाशिकमध्ये अडीच लाख लशी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे आपण तिसऱ्या लाटेशी समर्थपणे मुकाबला करू शकू,असा विश्वास नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close