ताज्या घडामोडी

हुतात्मा स्मारक कारंजा लाड येथे माजी सैनिक संघठणा कारंजा लाड च्या सैनिकांनी अमर जवानांना श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा केला*

प्रतिनिधी नरेंद्र बोरकर कारंजा वाशिम

*हुतात्मा स्मारक कारंजा लाड येथे माजी सैनिक संघठणा कारंजा लाड च्या सैनिकांनी अमर जवानांना श्रद्धांजली वाहून विजय दिवस साजरा केला*

वाशिम मधल्या कारंजा लाड येथे माजी सैनिकाकडून भारताचे स्वातंत्र्य चिरकाल टिकऊन ठेवण्यासाठी ज्या विर सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले त्यांच्या बलिदानाला त्यांच्या शौर्याला आज कारंजा लाड येथील हुतात्मा स्मारक कारंजा येथे माजी सैनिकाकडून अमर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कारगिल विजय दिवस साजरा केला..
. कारगिल युद्धात आपल्या ४२७ वीर योद्धाला रक्ताची आहुती द्यावी लागली व १३०० पेक्षा जास्त सैनिक घायाळ झाले होते. या मध्ये तरुण सैनिक ज्यांनी वयाची तिशी सुद्धा ओलांडली नव्हती. या दरम्यान शेजारी शत्रूच्या ४००० पेक्षा जास्त सैनिक व घुसखोरांना कंठ स्नान घालून भारतीय सेनें च्या जाबाज सैनिकांनी शौर्य व बलिदानाच्या सर्वोच्च परम्परेचे पालन केले ज्याची शपत प्रत्येक सैनिक तिरंग्यासमोर घेत असतो. त्यामुळेच आज २२ वर्षानंतर सुद्धा त्यांना स्मरण केलें जाते कारण त्याचे बलीदान व त्यानी केलेली शेजारी शत्रुची दाणादाण प्रत्येक भारतीयांच्या स्मरणात सदैव राहावी व त्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारत वासी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर रहावा जेणे करून परत कुणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही .
आजच्या हया पावन दिवशी माजी सैनिक संघटना कारंजा लाडच्या वतीने हुतात्मा स्मारक कारंजा लाड येथे सर्व उपस्थित सैनिक यांच्या कडून त्या सर्व अमर जवानांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या परिवाराला ईश्वर खूप शक्ती देवो अशी प्रार्थना केली.

प्रतिनिधी नरेंद्र बोरकर कारंजा वाशिम

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close