ताज्या घडामोडी

चिंताजनक : -जळगांव जिल्ह्यात खुना सह विविध गंभीर गुन्हेच्या घटनांमध्ये वाढ सामान्य जनतामध्ये भीती : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर*

*चिंताजनक : -जळगांव जिल्ह्यात खुना सह विविध गंभीर गुन्हेच्या घटनांमध्ये वाढ सामान्य जनतामध्ये भीती : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर*

*ठळक मुद्दे*

गेल्या काही दिवसां पुर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातच फायटर, दगने कौटुंबिक वादातून दोन गटांत तुफान हाणामारीची घटना     

सध्या जळगांव येथील उपमहापौर    यांच्यावर गोळीबार होण्याची घटना  

—————————————-
सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- संपूर्ण जळगांव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था कायम राखुन सर्वसामान्य जनतेला भयमुक्त ठेवण्याची अधिकृत जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव यांची असल्याने याकडे त्यांच्याकडून गंभीरता पूर्वक व हवे असे लक्ष दिलेजात नसल्याने की काय जिल्ह्यात दिवसोदिवस गुन्हेगारी व गुंडगिरी वेगाने वाढत चाललेली असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लुट, नकली नोटांचा प्रकार, जबरीने चोऱ्या, खंडणी वसूली, गोवंश सह वाहनाच्या चोर्‍या,नोकरीचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक, अवैधरीत्या गोवंश तस्करी, सामूहिक किंवा जबरी अपहरण करून बलात्कार, महिलांना रोडावर मारहाण, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबारची घटना सह भरदिवसा होणारे लोकांचे खून, विनयभंग, गावठी रिव्हॉल्वर जीवंत कारतूसे, धारदार शस्त्र प्राण घातक हत्यार स्वतःच्या कब्जात ठेवून सोबत बाळगून सर्वसामान्य जनतेत निश्चितच दहशत निर्माण करण्याच्या ईराद्याने भयावय घटना कायद्यांचे कोणतेच धाक न ठेवता राजरोसपणे गुंड्यांकडून दिवसाआड होतांना दिसत आहे.

तसेच होटलांमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारुची जास्त भावाने विक्री जुगार अड्डे, बनावट दारू तयार करून विक्री, राज्यामध्ये बंदी असूनही मोठ्या प्रमाणावर विमल गुटखा सह विविध प्रकारचे गुटखा पुढया, तंबाखूजन्यपदार्थाची सर्रासपणे विक्री वगैरे अवैध कारभार सुरू असल्यांने सुद्धा गुन्हे व गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत आहेत. गुन्हे घडल्यानंतर पोलीसांकडून कारवाया होत असते गुन्हेगारांना अटक केली जाते हे खरे असले तरी कायद्यांचे धाक वचक गुन्हेगारांवर किती? यांचा विचार केला तर वास्तव काय हे नक्कीच कळेल.
याचे बोलके उदाहरण असे की सदरील घडत असलेल्या गंभीर स्वरूपाच्या घटनांना आळा बसावा महणूच कायदेशीर रित्या कठोरपणे कारवाई करून लोकांना भयमुक्त करावे याबाबत भुसावळ येथील एका आमदाराने सुद्धा नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव यांना निवेदन दिले आहेत.

सदरील घडकत असलेल्या गंभीर स्वरुपाच्या दखलपात्र घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. कारण की कायद्यांचे धाकच गुंडगिरी वर्गात उरलेला दिसुन येते नाही परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याला जबाबदार कोण? कायद्यांचे धाक व त्याचा वचक निर्माण होण्या ऐवजी गुन्हे व गुन्हेगारी अधिक होणे मागचे कारण काय? सध्या वाढत असलेली गुन्हेगारी नकोशी व्हावी आणि गुन्हेगारांना वाटणी वर आणण्यासाठी संवेदनशीलता बाळगुन तत्परता कर्तव्यदक्षताची स्वतः जाण ठेवून आता तरी योग्यरीत्या कठोर पाऊल उचलणे गरजेचे नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच सर्वसामान्यांना थरकाप सोडविणाऱ्या वेळोवेळी एका मालिका प्रमाणे घडीत असलेल्या सदरील घटनांमध्ये अधिक भर टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात महिला दक्षता विभागांमध्ये तारिखवर आलेल्या लोकांमध्ये कौटुंबिक वादातून दोन गटात फायटर, दगडांचा वापर करून लाथाबुक्क्यांनी महिला आणि पुरुष यांनी तुफान हाणामारी केल्याची घडलेली घटना व या धक्कादायक घटनेत जखमी झालेले तीन लोकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तसेच सध्या जळगांव येथील उपमहापौर यांच्यावर गोळीबार होण्याची घटना बरेच काही सांगून जाते म्हणूनच जळगांव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असे म्हटले तरी यात गैर वाटणे सारखे काहीच नाही.

तरी जळगांव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदरील गंभीर घटनांपासून नागरिकांच्या मनातील भीती नष्ट करण्याकामी वाढत चाललेली गुन्हेगारीचा किल्ला भेदून त्याला संपवण्या करिता थेट नाशिक परिक्षेत्र नाशिक विभागाचे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close