ताज्या घडामोडी

अपघातात दुखापत असतानाही शिवसेना वाढीसाठी अहोरात्र झटणारी रणरागिणी उपजिल्हा संघटीका अँड.निलमताई चोरगे

अपघातात दुखापत असतानाही शिवसेना वाढीसाठी अहोरात्र झटणारी रणरागिणी उपजिल्हा संघटीका अँड.निलमताई चोरगे

खालापूर – समाधान दिसले

खालापूर तालुक्यात अनेकांनी शिवसेना पक्ष वाढी अनेकांनी जीवाची बाजी लावत पक्षाला बळकटी देण्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळत असताना अशीच शिवसेनेची रणरागिणी अँड.निलमताई चोरगे ह्या शिवसेना महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार महेंद्र थोरवे, महिला आघाडी जिल्हा संघटीका रेखाताई ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र पक्ष संघटना वाढीसाठी मेहतन घेतानाचे पाहावयास मिळत असून निलम चोरगे ह्याचे गेल्या 7 महिन्यापूर्वी अपघात होऊन त्यात त्या मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या होत्या. तर त्यांनी आपल्या इच्छाशक्ती जोरावर यावर मात करुन दुखापतग्रस्त असतानाही चोरगे ह्या पक्ष वाढी झटत आहेत.

अँड.निलम चोरगे यांनी पक्ष वाढीसाठी घेतलेली अपार मेहनत व त्याची पक्षावर असलेली निष्ठा लक्षात घेऊन महापौर किशोरी पेडणेकर, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा संघटीका रेखा ठाकरे यांनी अँड.निलम चोरगे याच्यावर उपजिल्हा संघटीका पदावर नियुक्ती केल्याने या पदाला साजेसे काम करित आपल्या कार्यातून चोरगे समाजात वेगळे स्थान निर्माण केले असून चोरगेंची सामाजिक कार्यासाठी असलेले तळमळ पाहता माणकीवली ग्रामपंचायत निवडणूकीत येथील जनतेने अँड.निलम चोरगे यांना भरघोस मतानी निवडणूक देत सदस्य पदावर वर्णी केली.

तसेच निलम चोरगे ह्या हॉटेल व्यवसायिका असून या पेशाने वकील, ग्रामपंचायत सदस्या असतानाही हा सर्व कामाचा व्याप सांभाळून चोरगे ह्या शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी कंबर कसून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे व महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम करीत असल्याचे पाहायला मिळत असल्याने तालुक्यातील असंख्य महिला वर्गाला अँड.चोरगे यांच्या कार्याचा हेवा वाटत आहे. तर अँड. निलम चोरगे यांचे गेल्या 7 महिन्यापूर्वी अपघात होऊन अपघातात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असताना 10 दिवस चोरगे यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ही सर्व दुखापत असतानाही येवढ्या मोठ्या संकटावर अँड.चोरगे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली असून अदयाप अँड.चोरगे दुखापतग्रस्त असतानाही सर्व दुःख बाजूला सारून त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

तर अपघातग्रस्त अँड.निलम चोरगे ह्या सतत महिला कार्यकर्त्यांच्या फोनद्वारे संपर्कात असून शिवसेनेच्या कार्यक्रमात येऊन महिला वर्गाच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहावयास मिळत असल्याने अँड.चोरगे ह्या लवकरात लवकर या सर्व संकटातून बाहेर पडावे अशी प्रार्थना महिला वर्ग करीत असून आमच्या महिल्या नेत्या पुन्हा आमच्यात सक्रिय होवोत अशी चर्चा करित आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close