ताज्या घडामोडी

सावदा फिल्टरेशन प्लांटवर गढूळ पाणी शुद्ध करण्याची कसरत सुरू: शहराच्या काही भागात अस्वच्छ पाणीपुरवठा*

*सावदा फिल्टरेशन प्लांटवर गढूळ पाणी शुद्ध करण्याची कसरत सुरू: शहराच्या काही भागात अस्वच्छ पाणीपुरवठा*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हतनूर धरणातून होणाऱ्या गढूळ पाणी पुरवठा येथील फिल्टरेशन प्लांट वरती शुद्ध व स्वच्छ करण्यासाठी सावदा पालिका कर्मचारी हे मोठी मेहनत घेत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडल्याने हतनूर धरणाची ४१ दरवाजे उघडलेले आहेत. सदर धरणातून सावदा शहराकरिता पाणीपुरवठा सुरू असते मात्र धरणातून येणारा गढूळ पाणी दररोज स्वच्छ करण्यासाठी सरासरी ८०० ते ८५० किलो तुरटी इलेक्ट्रोफोकलंड पावडर शहरासाठी येणाऱ्या गढूळ पाणी स्वच्छ व शुद्ध करण्याकामी वापरला जाते.

सदरील गढूळ पाणी पालिकेतील संबंधित कर्मचारी मोठी मेहनत घेऊन स्वच्छ व शुद्ध करून हा पाणी नंतर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवण्याची जबाबदारी पार पाडत राहतात.

सदरील प्लांटवरती पाणी शुद्ध करण्यासाठी सध्या सावदा पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी इंजिनियर जितेश पाटील सह सर्व पाणी पुरवठा कर्मचारी हे मेहनत घेत आहे.

मात्र शहरात आठ दिवसापासून काही भागात गढूळ पाणी नळाला येत असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यावरून सदरील पाणी फिल्टर प्लांट वर आज दि.२५ जुलै रोजी दुपारी १२ वा राष्ट्रवादीचे न.पा. विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, माजी नगराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी पाणी फिल्टर प्लांटवर जावून समक्ष पहाणी करून शहरात कुठेही गढूळ पाणी पुरवठा होव नये याची दक्षता घेण्यात यावी तसेच पाणी शुद्ध करण्याकामी तुरटी सह इतर साहित्य ची कमतरता मुख्याधिकार्‍यांना सांगून होऊ देणार नाही. असे येथील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच येथील स्वच्छ होत असलेल्या पाणीचा स्वत: दोघांनी पिऊन टेस्ट केला. यावेळी पाणी फिल्टर प्लांट वर पालिका,पाणी पुरवठा निरीक्षक अवि पाटील, कर्मचारी विकास भंगाळे,पृथ्वी भंगाळे,पंकज बेंङाळे, नरेंद्र राणे उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close