ताज्या घडामोडी

मध्यप्रदेश मधील पंचवीस वर्षे वयाच्या युवकाची चांदवड मध्ये आत्महत्या* चांदवड तालुका प्रतिनिधी: सुनिल आण्णा सोनवणे

*मध्यप्रदेश मधील पंचवीस वर्षे वयाच्या युवकाची चांदवड मध्ये आत्महत्या*
चांदवड तालुका प्रतिनिधी: सुनिल आण्णा सोनवणे

रात्री बारा वाजेच्या सुमारास चांदवड येथील रेणुका देवी मंदिर मंदिराकडे जाणाऱ्या मुंबई महामार्ग महामार्ग लगत असलेल्या देवी हट्टी या भागात रहायला असणारे मजूर चांदवड शहरात जे पाईपलाईनचे काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टर कडे मध्यप्रदेशातून काही मजूर चांदवड येथे कामासाठी आलेले आहेत ते मजूर चांदवड शहरातील पाणीपुरवठा बद्दल जी पाईप लाईन चालू आहे त्या तेजस कन्स्ट्रक्शन या कंपनीत पाईपलाईनचे काम करतात त्यातीलच एक कामगार वकील सुकलाल जमरे (पंचवीस वर्ष) राहणार पानवाडा, तालुका जिल्हा :खरगोन (मध्य प्रदेश) या मजुराने मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन केलेली आहे आईचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे तर वडिलांचा अपघात झाला आहे लहान बहीण लग्नाच्या उंबरठ्यावर आहे या सर्व गोष्टींमुळे दीड ते दोन लाख रुपये कर्ज डोक्यावर असल्याकारणाने तो अधिकच टेन्शनमध्ये होता. त्यामुळे त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बारवकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, ठाणे अंमलदार अहिरे,व पोलीस कर्मचारी करत आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close