ताज्या घडामोडी

किरण रंभाजी पगारे -अंधाराच्या पाठीवरील काजवा..*

*किरण रंभाजी पगारे -अंधाराच्या पाठीवरील काजवा..* … संपादकीय लेख. संपादक शांतारामभाऊ दुनबळे. लेखक अविनाशजी गायकवाड. नेते.
आज 24 जुलै किरण पगारेंचा जन्मदिवस.नाशिकरांसाठी एक परिचित अस नाव. जाखोरी गावचे रंभाजी पगारे व त्यांच्या पत्नी शाहुताई यांच्या पोटी दिं. 24/7/1952 साली किरणभाऊ जन्मास आले. रंभाबाबा इंडिया सिक्विरीटी प्रेसला कामाला होते. त्यांना पाच मुलं आणि तीन मुली असा मोठा परिवार. सरकारी पगारात स्वाभिमानी आयुष्य जगत नेहरू नगर, दहा चाळ, पेंढारकर काॅलनी ह्या ठिकाणी वास्तव्य केले. किरणजी दहावी पर्यन्त शिकले. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तीन वर्ष नोकरी केली. पंरतु बालपणापासुन समाज सेवेची आवड असल्याने त्यांचे मन नोकरीत रमले नाही. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी समाज कार्यात स्वतःतला झोकून दिले. दिन-दुबळ्यांचा हक्काचा माणूस म्हणुन किरण पगारेंकडे बघितले जाते. वयाच्या सत्तरीतला पोहोचलेला हा कार्यकर्ता आजही प्रचंड उर्जेने भरलेला आहे. पत्नी विजयाताई, मुलं अमित व प्रितम अन एक मुलगी कविता ही सासरी सुखी समाधानी जिवन जगत आहे. किरण पगारे साहेब आता उपनगर येथे राहतात. 1972 सालापासून आजपर्यंत हजारो गरजूंना रेशन कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणारे किरणजी दिलखुलास व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी जपत पगारे साहेब आजही अविरतपणे आपली सेवा बजावत आहेत. किरण सरांचे शेकडो चाहते आहेत. उभ्या आयुष्यात कधीही कुणाच्याही विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही.
दुःखं अडवायला ऊंबर्यासारखा मित्र एक असावा किरणभाऊंसारखा.
किरणजी पगारे साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा. 🙏🙏🙏
(अविनाश गायकवाड लहवित)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close